शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

By admin | Updated: December 25, 2015 01:44 IST

बीव्हीजी इंडिया लिमिटेड द्वारे संचालित १०८ इमरजन्सी मेडीकल सर्व्हीसद्वारे डॉक्टरांना निकृष्ठ दर्जाची वागणुक मिळत असून....

अधिकाऱ्यांशी चर्चा : समस्या तात्काळ निकाली काढण्याची केली मागणी साकोली : बीव्हीजी इंडिया लिमिटेड द्वारे संचालित १०८ इमरजन्सी मेडीकल सर्व्हीसद्वारे डॉक्टरांना निकृष्ठ दर्जाची वागणुक मिळत असून अत्यंत कमी वेतनात अत्यंत संवेदनशील आपातकालीन वैद्यकिय सेवा राबवून घेतात या समस्या तात्काळ सोडविण्यात यावे असे निवेदन आपातकालीन वैद्यकिय अधिकारी असोसिएशन भंडारा तर्फे नुकतेच मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.या निवेदनाप्रमाणे शासनाने मार्च २०१४ पासून ही योजना संपुर्ण महाराष्ट्रात जनसामान्यासाठी सुरु केली आहे. अर्थातच ही योजना रुग्णासाठी एकप्रकारे संजीवनीच ठरली आहे. शासनाने ही योजना ठेकेदारी पध्दतीने बीव्हीजी इंडिया लि. पुणे या कंपनीला दिला आहे. यामध्ये १०८ इंडिया लिमिटेड पुणे अ‍ॅम्बुलन्स डॉक्टर(ईएमएसओ) व पायलट असा संपुर्ण संच काम करतो. यामध्ये महत्वाचा स्तंभ डॉक्टर आहे. ज्याच्याद्वारे रुग्णांना जिवदान मिळते पंरतु ह्याच डॉक्टरांना अत्यल्प वेतनात फक्त १० हजार रुपये रोजंदारी तत्वावर सुरु केली आहे. हा डॉक्टरांच्या अपमान आहे. व सेवा मात्र पुर्णपणे घेतात व त्यांना एक कर्मचारी म्हणुन दर्जा देण्यात येत नाही.त्यामुळे शासनाने डॉक्टरांना स्थाई म्हणून कार्यरत करावे व रोजंदारी पध्दती रद्द करावी. मासिक वेतन ३० ते ३२ हजार एवढे करण्यात यावे. व्यवसाय कर व भविष्य निर्वाह निधी कपात करुन पावती देण्यात यावी, डॉक्टर व पायलट यांचा विमा ४ लक्ष रुपयाचा काढण्यात यावा, शहरी व ग्रामीण डॉक्टरांचे वेतन समान असावे. भंडारा व गोंदिया हे जिल्हे नियमाप्रमाणे सोयीसुविधा देण्यात यावी, गाडी आॅफ रोड असतांना पगार कापण्यात येऊ नये, वर्षाच्या १२ सुट्या देण्यात याव्यात. यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. (तालुका प्रतिनिधी)