शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ चौकशी समितीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात

By admin | Updated: June 16, 2016 00:44 IST

पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणाची दखल घेत चौकशी समितीने कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले.

प्रकरण बयाण गोपनीयता भंगचे : अहवालाकडे अनेकांच्या नजराभंडारा : पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कर्मचाऱ्यांचे बयाण गोपनियता भंग प्रकरणाची दखल घेत चौकशी समितीने कर्मचाऱ्यांचे बयाण घेतले. याला नऊ दिवसाचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही समितीने जिल्हा आरोग्य समितीकडे अहवाल सादर केला नाही. त्यामुळे अहवाल सद्यस्थितीत चौकशी समितीच्या गुलदस्त्यात आहे. १७ जूनला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा असूनही अहवाल सादर न झाल्याने सभेत अहवाल सादर होणार नसल्याचे दिसून येत आहे. अहवाल सादर करण्याच्या विलंबामुळे अधिकाऱ्यांसह जिल्हा परीषद वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे.लसविषयी निष्काळजीसंदर्भात दोन आरोग्य अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम कार्यरत १० कर्मचाऱ्यांचे प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे बयाण घेतले. मात्र घेण्यात आलेले ते बयाण सार्वजनिक झाले होते. याची अधिकाऱ्यांना तक्रार करण्यात आली. त्यानंतर एकाच प्रकरणाचे तीनदा बयाण नोंदविण्यात आले होते. मात्र १० कर्मचाऱ्यांचे बयाण घेण्यात आले, त्यांच्यावर अजूनही बयाण गोपनियता भंगाची कारवाई करण्यात आली नाही. त्यांना अधिकाऱ्यांकडूनच पाठबळ मिळत असल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. या प्रकरणातील सत्य समोर येण्यासाठी जिल्हा आरोग्य समितीने पाच सदस्यीय चौकशी समिती गठित केली होती. या समितीने ६ जून रोजी कर्मचाऱ्यांचे लेखी स्वरुपात बयान घेतले. चौकशीचा अहवाल सर्वसाधारण सभेपुर्वी जिल्हा आरोग्य समितीच्या बैठकीत सादर करणार असल्याची शक्यता चौकशी समितीने वर्तविली होती. मात्र नऊ दिवस लोटले तरी अहवाल सादर करण्यात आलाच नाही. त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या संदर्भात जिल्हा परिषेदेचे आरोग्य सभापती विनायक बुरडे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अद्यापही चौकशी समितीने माझ्याकडे अहवाल सादर केला नसल्याचे सांगितले. (नगर प्रतिनिधी)'वाघासमोर शेळी' कर्मचाऱ्यांचे बयान सर्वाजनिक होण्याला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी समितीत निवड करण्यात आली. त्यांनी चौकशी समितीसोबत जाऊन कर्मचाऱ्यांचे लेखी स्वरुपात बयान घेतले. प्रकरणात अधिकारी दोषी असल्याचा आरोप होत असताना त्याच अधिकाऱ्यांकरवी कर्मचाऱ्यांचे बयान घ्यावे, म्हणजे 'वाघासमोर शेळी' अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झाली असावी, अशी चर्चा आता रंगू लागल्या आहेत. प्रशासनाचे मौनकर्मचाऱ्यांचे गोपनीय बयान सर्वाजनिक करणे चुकीचे आहे, असे खुद्द आरोग्यमंत्र्यांसह अनेक वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र प्रशासन या प्रकरणाला कलाटणी देऊन गोपणीय बयान सर्वाजनिक करण्यासाठी जणू पाठबळच देत असल्याचे अधिकाऱ्यांच्या चर्चेवरुन दिसून येते. वरिष्ठांकडून दोषिंना पाठबळ मिळत राहिल्यास येत्या काळात अधिकारी विरुध्द कर्मचारी असा सामना नेहमीच रंगल्याचे दिसून येईल.चौकशी समितीने ६ जून रोजी कर्मचाऱ्यांचे लेखी स्वरुपात बयान घेतले. समितीने कर्मचाऱ्यांच्या बयानांचे अवलोकन केले. अहवाल पुर्णत: तयार करण्यात आला आहे. जिल्हा परीषद आरोग्य समितीसमोर अहवाल लवकरच सादर करण्यात येईल.- प्रदीप बुराडे, अध्यक्ष, चौकशी समिती, तथा सदस्य, जिल्हा आरोग्य समिती,भंडारा.