शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By admin | Updated: July 5, 2017 00:56 IST

नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ज्योती विनोद गायकवाड (३०) रा.नेरला या महिलेला अड्याळ ग्रामीण रुग्णालयातून भंडारा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले.

पतीची तक्रार : प्रकरण नेरला येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूचेलोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या ज्योती विनोद गायकवाड (३०) रा.नेरला या महिलेला अड्याळ ग्रामीण रुग्णालयातून भंडारा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र सात तास लोटूनही उपचार करण्यात न आल्याने तिचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. हलगर्जी करणाऱ्या संबधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाईची मागणी विनोद गायकवाड यांनी वरिष्ठांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ही घटना ५ जून रोजी घडली होती. पवनी तालुक्यातील नेरला येथील ज्योती गायकवाड या नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेला ४ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास अड्याळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला दि. ५ जून ला रात्री २ वाजताच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यादरम्यान ज्योतीवर डॉक्टरांकडून उपचार झाले नाही, असा आरोप आहे. ५ जून रोजी सकाळी ७.३० वाजता तपासणीकरिता डॉक्टर आले. त्यावेळी ज्योतीची प्रकृती अधिकच खालावल्याने तिला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. आले. भंडाऱ्यावरून नागपूरला नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला.५ जून ला रात्रीच्या सुमारास ज्योतीला वेळेवर उपचार मिळाला असता तर कदाचित तिचा मृत्यू झाला नसता. गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी आहे.