शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
3
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
4
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
5
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
6
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
7
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
8
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
9
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
10
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
11
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
12
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
13
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
14
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
15
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
16
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
17
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?
18
Shalarth ID Ghotala: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे पुनर्मुल्यांकनाचे काम रखडणार, नवी गुणपत्रिका कोण बनविणार?
19
Yuzvendra Chahal Shashank Singh, IPL 2025: "पंजाब किंग्जसाठी युजवेंद्र चहल आणि टीम बसचा ड्रायव्हर एकसमान"; शशांक सिंगचे विधान व्हायरल
20
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! उद्यापासून २४ तास 'या' भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

वेतन त्रृृट्या दुरूस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 22:41 IST

शासनाच्या प्रत्येक कार्यालयात लिपीक कार्यरत आहेत. मात्र त्या संवर्गात वेतन तृट्या अद्याप दुरूस्त झाल्या नाही.

ठळक मुद्देमाणिकराव ठाकरे : लिपिकवर्गीय समिती सभा

आॅनलाईन लोकमतभंडारा : शासनाच्या प्रत्येक कार्यालयात लिपीक कार्यरत आहेत. मात्र त्या संवर्गात वेतन तृट्या अद्याप दुरूस्त झाल्या नाही. त्यामुळे चवथ्या वेतन आयोगापासून प्रलंबित असलेल्या सर्व लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या त्रृट्या तातडीने दुरूस्त करून बुधवारपर्यंत बक्षी समितीला त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश विधान परिषद उपसभापती तथा विनंती समिती अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे.विधान परिषद विनंती समितीची सभा गुरूवारला मुंबई येथे पार पडली. या सभेत त्यांनी सदर निर्देश दिल्याची माहिती लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने, जिल्हाध्यक्ष प्रभू मते, जिल्हा सचिव यशवंत दुणेदार यांनी दिले.या समिती सभेला वित्त सचिव नितीन कतरे, ग्राम विकास प्रधान सचिव, आमदार ना.गो. गाणार, आ. हरिभाऊ राठोड, आ. नरेंद्र पाटील यांच्यासह लिपीक वर्गीय संघटनेचे राज्याध्यक्ष गिरीष दाभाडकर, उमाकांत सुर्यवंशी, अवर सचिव भंडारकर, उपसचिव वि.द. शिंदे, उपसचिव गिरीष भालेराव, उपसचिव जाधव, राज्य कार्याध्यक्ष सचिन मगर, विभागीय सचिव मारोतराव जाधव, सोलापूर जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांच्यासह प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते.यावेळी आ. ना.गो. गाणार यांनी लिपीक संवर्गावर चवथ्या वेतन आयोगापासून अन्याय झाला असून त्यांच्या बरोबरीचे इतर संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ झाली आहे. परंतु या लिपीकांवर अद्यापही अन्याय होत असल्याचा ठपका ठेवला. इतके वर्ष होऊनही या बाबींवर शासनाने तोडगा काढलेला नाही. त्यामुळे लिपीक वर्गीय कर्मचाºयांमध्ये असंतोष धुसपूसत आहे.दरम्यान वित्त सचिव नितीन गद्रे यांची याप्रकरणात साक्ष झाली. तत्पूर्वी झालेल्या सभेत ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांनी लिपीकांच्या वेतन श्रेणीमध्ये अन्याय झाल्याचे मान्य केले होते.त्यानुसार त्यांनी प्रस्ताव वित्त विभागास सादर केला होता. सदर प्रस्तावाबाबत वित्त सचिवांची साक्ष अत्यंत महत्वाची होती, असेही त्यांनी म्हटले होते.२८ फेब्रुवारीपर्यंत दिली मुदतसातवा वेतन आयोग येत्या कालावधीत कर्मचाऱ्यांना लागू होत आहे. चवथ्या वेतन आयोगापासूनच लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात तफावत पडलेली आहे. ती अद्यापही दूर केलेली नाही. लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांचा हा मुद्दा आमदारांनी लावून धरला. यावर विधान परिषद उपसभापती तथा विनंती समिती अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी लिपीक वर्गीय कर्मचारी संवर्गावर झालेल्या अन्यायाची तातडीने दुरूस्ती करावी व सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी त्रृट्या दुरूस्त कराव्या, सहाव्या वेतन आयोगामध्ये दुरूस्ती करून तसा अहवाल २८ फेब्रुवारीपर्यंत बक्षी समितीला सादर करण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले आहे.