शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागझिरा अभयारण्यातील हत्ती कॅम्पचे तीन वर्षापूर्वी स्थानांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

नवेगाव, नागझिरा जंगल पूर्वी खूप संपन्न होते. मध्यप्रदेशातून या भागात रानटी हत्ती यायचे. त्यावरूनच या भागात हत्तीखोज, हत्तीडोह, हत्तीमारा, हत्तीखोदरा, हाथीपागडी अशी नावे जंगल भागाला आहेत. यावरूनच या परिसरात हत्तींचे अस्तित्व होते. वनविभागाने १९६७ मध्ये वनविभागातील काम करण्यासाठी हत्ती कॅम्प सुरू केला. आसाममधून हरेलगज, मावी, मुक्तमाला, रूपा या हत्तींना आणण्यात आले. त्यापैकी केवळ रूपा जिवंत असून ती आता ७८ वर्षांची आहे.

संजय साठवणेलोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : समृद्ध वृक्षवेलींनी नटलेल्या आणि जैवविविधतेत अव्वल असलेल्या नागझिरा अभयारण्यात हत्ती कॅम्प अस्तित्वात होता. ५१ वर्षे या जंगलात हत्तींचा कॅम्प होता. मात्र तीन वर्षांपूर्वी येथील कॅम्प गडचिरोली जिल्ह्यातील सिराेंचा वनविभागातील कमलापूर येथे हलविण्यात आला. येथे वास्तव्याला असलेल्या अनेक हत्तींच्या आठवणी आजही वनविभागात चर्चेला जातात. नवेगाव, नागझिरा जंगल पूर्वी खूप संपन्न होते. मध्यप्रदेशातून या भागात रानटी हत्ती यायचे. त्यावरूनच या भागात हत्तीखोज, हत्तीडोह, हत्तीमारा, हत्तीखोदरा, हाथीपागडी अशी नावे जंगल भागाला आहेत. यावरूनच या परिसरात हत्तींचे अस्तित्व होते. वनविभागाने १९६७ मध्ये वनविभागातील काम करण्यासाठी हत्ती कॅम्प सुरू केला. आसाममधून हरेलगज, मावी, मुक्तमाला, रूपा या हत्तींना आणण्यात आले. त्यापैकी केवळ रूपा जिवंत असून ती आता ७८ वर्षांची आहे. मात्र २६ मार्च २०१८ रोजी नागझिरा येथून हत्ती कॅम्प कमलापूर येथे स्थानांतरित करण्यात आला. आता येथे हत्ती नसले तरी हत्तींच्या आठवणी मात्र आजही वनविभागात चर्चेचा विषय असतो.

राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प - सिरोंचा वनविभागांतर्गत येणारा कमलापूर हा एकमेव हत्ती कॅम्प आहे. या ठिकाणी सध्या बसंती, मंगला, अजित, राणी, गणेश, प्रियंका आणि नागझिरातून गेलेली रूपा आहे. येथील जंगलात हत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने तेथे हत्तींची संख्या वाढत आहे. परंतु प्रशिक्षित माहूत अद्यापही मिळाला नाही. 

संस्कारित रूपा - नागझिरा अभयारण्यातून कमलापूरला गेलेली रूपा ही हत्तीण संस्कारित आहे. हत्तिणीवर व्ही. अप्पू पण्णीकर (केरळ), धर्मा धुर्वे आणि मूलचंद मसराम या माहुतांचा प्रभाव पडला होता. पीछे, बैठ, ट्रे, मल या शब्दावर करावयाच्या कृतीचा तिला अद्यापही विसर पडला नाही.

पुन्हा हत्ती कॅम्प उभारावानवेगाव नागझिरा जंगलात पूर्वी हत्तीचे वास्तव्य होते. हा भाग संपन्न होता. मात्र या जंगलाचे वैभव असलेला हत्तीकॅम्प आता येथून हलविण्यात आला. शासनाने पुन्हा हत्ती कॅम्प नागझिरा अभयारण्यात उभारावा, अशी अपेक्षा आहे.              

 -विनोद भावते,                           अरण्ययात्रा पुस्तकाचे लेखक.

 

टॅग्स :Nagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्पforest departmentवनविभाग