शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
4
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
5
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
7
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
8
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
10
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
11
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
12
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
13
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
14
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
15
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
16
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
18
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
19
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
20
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?

पाणी व स्वच्छता कर्मचाऱ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 05:00 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधन केंद्रामधून कंंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी स्वरूपात दिला आहे.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासनाचे आदेश : सेवा नियमितेसाठी कर्मचारी महासंघाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील जिल्हा, पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधण केंद्रातील कंत्राटी कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्यास मुंबई उच्च न्यायालयाचे स्थगिती दिली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन आणि तालुकास्तरीय गटसाधन केंद्रामधून कंंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा सुरू ठेवण्याचा आदेश शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी स्वरूपात दिला आहे.त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेंतर्गत पाणी व स्वच्छता मिशनच्या कंत्राटी कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने राज्यातील ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना २७ जुलैपासून सेवा समाप्त करण्याचा आदेश काढला होता. यावर कंत्राटी कर्मचारी संघाने पाठपुरावा केल्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र त्यानंतर कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्यानंतर शासनाच्या निर्णयाविरूद्ध कंत्राटी कर्मचारी महासंघाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.२६ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या सुनावणीमध्ये कंत्राटी कर्मचाºयांची सेवा समाप्त करण्यात आणि मुदतवाढ देण्याच्या शासनाच्या पत्रास पुढील आदेशापर्यंत उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या निर्णयामुळे राज्यातील ११०० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाल्याने कर्मचारी महासंघाने शासनाचे आभार मानले आहेत.हे सर्व कंत्राटी कर्मचारी १८ वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांना कमी करून आऊटसोर्सिंग करू नये यासाठी शासनाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. यावर न्यायालयाने शासनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी पत्र काढून जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचाºयांची सेवा कायम ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना परिपत्रक काढले आहे.कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीला अखेर स्थगितीपाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या, अशा सूचना काही आमदारांकडून देण्यात आल्या होत्या. विधानभवनात यासंदर्भात बैठक झाली. त्याबैठकीत कर्मचाºयांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करा, अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार काही आमदार व कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या पाठपुराव्यानंतर न्यायालयाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे राज्यातील ११०० कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.