शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीची अधिसूचना जारी

By admin | Updated: November 16, 2016 00:48 IST

जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगर परिषद सदस्य आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून...

पालिकेसाठी आचारसंहिता लागू : १९ पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणारभंडारा : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली नगर परिषद सदस्य आणि थेट नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केला असून या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी नगर परिषद निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. भंडारा-गोदिया विधान परिषदेची निवडणूक असल्यामुळे यापूर्वीच अधिसूचना जारी झाली असली तरी नगर पालिका क्षेत्रासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.भंडारा नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अनिल अढागळे यांची, तुमसर नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसिलदार डी.टी. सोनवणे यांची, पवनी नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी जी.जी. जोशी यांची तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसिलदार महेंद्र वाकलेकर यांची तर साकोली नगर परिषद निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एच.डब्ल्यु. खडतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.थेट जनतेतून नगराध्यक्ष आणि नगर परिषद सदस्यपदासाठी नामनिर्देशनपत्र देणे व स्वीकारणे १९ ते २५ नोव्हेंबर या दरम्यान राहणार आहे. नामनिर्देशन पत्र सादर करण्याची शेवटची तारीख २५ नोव्हेंबर असून सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. नामनिर्देशन पत्र छाननी २८ नोव्हेंबर रोजी असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ७ डिसेंबर आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप व निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते ५.३० पर्यंत मतदान होणार असून १९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजतापासून मतमोजणी होणार आहे.या नगर परिषद निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांची तर निवडणूक निरिक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी प्रदीप डांगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)नगरसेवक भ्रमंतीवरनगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वीपासून जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व पवनी येथील नगरसेवकांचा गावात राबता होता. त्यानंतर १८ डिसेंबर ही निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी ईच्छूकांच्या शहरभर भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. परंतु या निवडणुकीपूर्वी १९ नोव्हेंबरला विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आणि या निवडणुकीसाठी नगरसेवक मतदार असल्यामुळे आपला मतदार सुरक्षित राहावा, यासाठी त्या-त्या पक्षाने मतदारांना सुरक्षितस्थळी नेले आहे. दरम्यान नगर परिषद निवडणुकीची अधिसूचना आज मंगळवारला जारी झाल्यानंतर एकही नगरसेवक शहरात नसल्याचे चित्र पहिल्यांदाच दिसून येत आहे.येथे होईल मतमोजणीभंडारा येथील मतमोजणी पोलीस बहुउद्देशिय सभागृह भंडारा, तुमसर येथील मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तुमसर, पवनी येथील मतमोजणी नगर पालिका विद्यालय नवीन इमारत पवनी तर साकोली येथील मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन सेंदुरवाफा साकोली याठिकाणी होणार आहे.