शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

कोरोना रुग्णांच्या नातेवाइकांची बेडसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 05:00 IST

पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक या रुग्णालयातून त्या रुग्णालयात केवळ बेडसाठी भटकंती करीत असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसत आहे. एकदा बेड मिळाला तर ऑक्सिजनचीही मारामार होत असून, यात रुग्णाचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे मनोबल खचत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. भंडारा जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे.

ठळक मुद्देसर्व रुग्णालय हाऊसफुल्ल : बेड मिळाला तर ऑक्सिजनची मारामार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा स्फोट झाला असून, दररोज हजार ते दीड हजार रुग्ण निघत आहे. रुग्णालयात खाटांची संख्या कमी आणि दररोज वाढते रुग्ण यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयातही गत आठवड्याभरापासून बेड मिळणे कठीण झाले आहे. पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे नातेवाईक या रुग्णालयातून त्या रुग्णालयात केवळ बेडसाठी भटकंती करीत असल्याचे चित्र भंडारा शहरात दिसत आहे. एकदा बेड मिळाला तर ऑक्सिजनचीही मारामार होत असून, यात रुग्णाचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे मनोबल खचत असल्याचे चित्र सर्वत्र आहे. भंडारा जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून कोरोना रुग्णांचा स्फोट होत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. अशा स्थितीत संपूर्ण आरोग्य यंत्रणा टोकडी पडत असल्याचे जाणवत आहे. भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी १४८१ खाटांची सद्यस्थितीत सुविधा आहे. त्यात शासकीय रुग्णालयात ७४१ आणि खासगी रुग्णालयात ७४० खाटा आहेत. शासकीय रुग्णालयात तर सध्या एकही बेड खाली दिसत नाही. भंडारा जिल्हा रुग्णालयातील आयसीयू वॉर्डसह कोरोना वॉर्ड रुग्णांनी फुल्ल झाले आहे. पवनी, साकोली आणि तुमसर येथेही शासकीय रुग्णालयात खाटा उपलब्ध नाहीत. अशीच अवस्था खासगी रुग्णालयांची आहे. खासगी रुग्णालयांची खाटाची क्षमता ७४० असून, तेथे सद्यस्थितीत ६९४ रुग्ण दाखल आहेत. एकीकडे खाटांची संख्या मर्यादित आणि दररोज हजार ते दीड हजार रुग्ण पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातील किमान २०० ते २५० व्यक्तींना रुग्णालयीन उपचाराची गरज असते. मात्र रुग्णांना रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. पॉझिटिव्ह व्यक्तीचे नातेवाईक गत आठ दिवसांपासून उपचारासाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात धाव घेत असल्याचे दिसत आहे. मात्र रुग्णालयात जागा नसल्याने अशा रुग्णांवर घरीच उपचार करण्याची वेळ आली आहे. प्रशासन विविध उपाय योजना करीत असली तरी रुग्णांची संख्या पाहता ती तोकडी ठरत आहे. यासाठी नागरिकांनीच संयम पाळण्याची गरज आहे.

ऑक्सिजनची मागणी वाढली पुरवठा अपुरा

भंडारा जिल्हा रुग्णालयाला सद्यस्थितीत दररोज ७०० ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केला जात आहे. मागणी मोठ्या प्रमाणात असली तरी जवळपास ७०० सिलिंडर रुग्णालयात येत आहेत. परंतु सध्याच्या स्थितीत हे सिलिंडर अपुरे पडत आहे. भंडारा येथे सनफ्लॅग कंपनी आणि नागपूर येथील रुख्मिणी तसेच भरतीया कंपनी ऑक्सिजनचा पुरवठा करीत आहे. प्रचंड मागणी वाढल्याने ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन सिलिंडरचे वाहन रुग्णालयात पोहोचले की नातेवाइकांची गर्दी होत आहे.

आरटीपीसीआर चाचणीसाठी प्रतीक्षा जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून आरटीपीसीआर चाचणी अत्यल्प केली जात आहे. ॲन्टिजेन चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डॉक्टर आरटीपीसीआर चाचणीचा सल्ला देतात. परंतु भंडारा जिल्ह्यात आता आरटीपीसीआर चाचणीसाठी कीटचा तुटवडा असल्याची माहिती आहे. त्यामुळेच केवळ शासकीय रुग्णालय आणि अल्पसंख्यांक वस्तिगृहातच आरटीपीसीआर चाचणी केली जाते. तेथेही पाच ते सहा तास रांगेत उभे रहावे लागते

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या