शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनीचे पुनर्वसन, टोली वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:55 IST

वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देचुकीचे सर्वेक्षण : नागरिकांमध्ये संताप, आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वैनगंगा नदीतिरावरील अर्जुनी गावाचे पुनर्वसन पुर्णत: करण्यात आले. मात्र याच गावाचा एक भाग असलेल्या अर्जुनी टोली पुनर्वसनापासून वंचित आहे. ४५० लोकवस्ती असलेल्या या टोलीतील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने केलेले सर्वेक्षण चुकीचे असल्याचा आरोप करीत नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.१९९४ साली आलेल्या महापुराने व गोसी प्रकल्पामुळे नदीकाठावरील गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी भंडारापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या अर्जुनी, जाख, खोलापूर या गावांचे शासकीय नियमानुसार सर्वेक्षण करून त्यांचे पुनर्वसन कारधानजीक गिरोला या गावी करण्यात आले. परंतु अर्जुनी येथील काही लोक जवळच असलेल्या अर्जुनी टोली या ठिकाणी राहत असतात. शासकीय सर्वेक्षण होत असताना त्यांना वगळण्यात आले. या ४५० लोकवस्ती असलेल्या अर्जुनी येथील लोकांचे अद्यापही पुनर्वसन झाले नाही. त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. अर्जुनी टोली या गावाजवळ अर्धा कि.मी. च्या आत गोसी धरणाचे पाणी येते. येथील लोकांच्या ८५ टक्के जमीनी या धरणाच्या पाण्याखाली आल्या आहेत. शासकीय नियमानुसार या गावांचे अर्धा कि.मी. पर्यंत धरणाचे पाणी येत असेल व ८५ टक्के जमिनी धरणाच्या पाण्याखाली असतील त्यांचे १०० टक्के पुनर्वसन केले जाते.गोसी धरणाचे अडवलेले पाणी गावाजवळ येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जंगली हिंस्त्र प्राणी व जलचर प्राणी गावात येत असल्याने नागरिकांत भीतीचे प्रमाण वाढले आहे.अर्जुनी टोली हा अर्जुनी गावाचाच एक भाग असून या गावाची लोकसंख्या ४५० इतकी आहे. हे गाव १०० टक्के पुनर्वसीत असूनसुद्धा शासनाच्या चुकीच्या सर्वेक्षणाने पुनर्वसनापासून वंचित राहिले आहे. या बाबीकडे शासनाने लक्ष दिले नाही तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनअर्जुनी टोली येथील गावकऱ्यांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी प्रहार जनशक्तीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर मंगेश वंजारी, अशोक फुले, चंद्ररेखा गाढवे, वासुदेव तुमसरे, संजय राघोर्ते, सोमेश्वर राघोर्ते, नरेश राघोर्ते, दिनेश गाढवे, कमलाकर गाढवे, ताराचंद सातपैसे, रामचंद्र गाढवे, देवीदास राघोर्ते, गोपीका निकुडे, चेतन राघोर्ते आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.