शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा!

By admin | Updated: January 12, 2017 00:23 IST

शहरातील अंतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायीकांचे अतिक्रमण काढण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणीभंडारा : शहरातील अंतर्गत रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या छोट्या मोठ्या व्यवसायीकांचे अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे अनेक कुटुंबियांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. अतिक्रमणाचा फटका बसलेल्या व्यावसायीकांचे पुनर्वसन करावे व त्यांना हक्काचे पट्टे द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केली आहे. कुटुंबाचे पालन पोषन करण्याकरिता अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरु केले. त्याकरिता अनेकांनी राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या मोकळ्या जागेवर दुकान सुरु केले. तर अनेकांनी शहरातील अंतर्गत मार्गावर व्यवसाय थाटले. मागील अनेक वर्षांपासून या व्यवसायीकांनी हा व्यवसाय करुन कुटुंबाचा गाढा सुरळीत चालविला आहे. मात्र डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग, नगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्यावतीने हे अतिक्रमण काढण्याची कारवाई केली. यामुळे मागील अनेक वर्षांपासून सुरळीतपणे व्यवसाय करणाऱ्यावर अचानक झालेल्या या कारवाईमुळे आभाळ कोसळले.फुटपाथवरील अतिक्रमण काढले. मात्र शहरातील अनेक धनदांडग्यांचे अतिक्रमण करुन केलेले बांधकाम काढण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून हा भेदभाव असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष शुभम बारापात्रे यांनी निवेदनातून केला आहे. या अतिक्रमणधारक फुटपाथ व्यवसायीकांचे पुनर्वसन करावे व त्यांना हक्काचे पट्टे द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मनसेकडून आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनविसेचे जिल्हाध्यक्ष शुभम बारापात्रे, अनुप हटवार, आयुष चौधरी, शशि माने, भागवत गिरोले, अभिजित नारनवरे, विक्रम सोनेकर, रोहीत झाडे, कार्तिक डेकाटे, अनिल मेश्राम, सचिन फेंडर, आकाश साठवणे, निखिल खांदाडे, रुपेश डोईफोडे, निकुंज निमजे, स्वप्नील हेडाऊ, साहिल सोनेकर, बिन्नी कटकवार, लक्ष्मण कटरे आदीनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)