शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना इतिहासजमा

By admin | Updated: November 24, 2015 00:44 IST

परिसरातील गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे व गाव पाणी टंचाईमुक्त व्हावे ...

योजना भंगारात : गावात अभिनव जलकूंभ, शासनाची निष्क्रियता कारणीभूतपवनी /पालोरा : परिसरातील गावातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे व गाव पाणी टंचाईमुक्त व्हावे यासाठी राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून बाम्हणी येथे जीवन प्राधिकरण योजना सुरू करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही योजना भंगारात पडली आहे.बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी थेट बाम्हणी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा येथे साठवून पाणी शुद्ध करून जनतेला पाणी पुरवठा करणे हा शासनाचा उद्देश होता. या योजनेअंतर्गत जवळपास १४ गावांना पाणीपुरवठा होणार होता. तर उन्हाळ्यात परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाईचे भीषण संकट पाहायला मिळते. गावात पाणी पुरवठा योजना आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची टंचाई भासत आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत गावागावात जलकुंभ उभारले आहेत. जवळपास तीस कि.मी. पाईपलाईन टाकल्या गेली आहे. मात्र गावकऱ्यांना अजूनपर्यंत या योजनेद्वारे पाणी मिळाले नाही. गेल्या पाच वर्षापासून ही योजना भंगारात पडली आहे. या योजनेला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले होते. सर्वांनी कमीशनचा लाभ घेऊन दुर्लक्ष केले होते. लक्षावधी रुपयाची पाईपलाईन जीर्ण टाकण्यात आली होती. परिणामी काही महिन्यातच फुटली. ही योजना सुरु करण्यात यावी म्हणून येथील उपसरपंच द्रोपद धारगावे यांनी पायपीट केली होती. मात्र त्यांना अपयश आले. आता या क्षेत्रात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. त्यामुळे आतातरी काही होणार कां? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आमदार, खासदार स्थानिक निधीतून गावात लक्षावधी रुपये देऊन भूमिपूजन करीत आहेत. मात्र बाम्हणी येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला न्याय देता आले नाही. सर्व कर्मचाऱ्यांनी पुढाऱ्यांनी आपली कमीशन घेवून गप्प बसले आहेत. शासनाच्या कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. मात्र याकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ दिसत नाही. ज्या गावात पाण्याची टंचाई आहे त्या गावात नवीन जलकुंभ तयार करण्यासाठी निधी दिली जात आहे. सध्या या योजनेचे साहित्य चोरीला जात आहेत. विजेचे अनेक उपकरणे चोरीला गेले आहेत. केवळ योजनेचा सांगाडा उभा आहे. या योजनेच्या नूतनीकरणासाठी लक्षावधी रुपयाचा खर्च आहे. मात्र वीज देयके थकल्याने वीज वितरण कंपनीने हातवर केले आहे. वीज पुरवठा पूर्वीच खंडीत करण्यात आला आहे. आता वाट आहे ती विद्युत मिटर नेण्याची. या योजनेची सुरक्षा वाऱ्यावर सोडली आहे. एकीकडे पिकाला पाणी मिळणे कठीण झाले आहे. तर दुसरीकडे पाण्याला पुज्य समजणाऱ्या जनतेला पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे. या योजनेसाठी राजकीय इच्छेसह पुढाकाराचीही गरज आहे. (तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)