शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
6
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
7
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
8
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
9
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
10
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
11
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
12
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
13
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
14
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
15
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
16
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
17
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
18
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
19
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
20
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)

ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास नकार

By admin | Updated: June 19, 2015 01:03 IST

मोहाडी तालुक्यातील खडकी येथे तंटामुक्त गाव समितीची बैठक १५ जून रोजी ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित केलेली होती.

करडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील खडकी येथे तंटामुक्त गाव समितीची बैठक १५ जून रोजी ग्राम पंचायत कार्यालयात आयोजित केलेली होती. बैठकीचे नोटीस ग्रामपचांयत शिपायांमार्फत सर्वांना पाठविण्यात आले. बैठकीची वेळ झाली,पदाधिकारी हजर झाले, मात्र शिपाई ग्रामपंचायतीचे कुलूप उघडण्यास तयार नव्हता. गावात असून, अनेकदा बोलावणे पाठवूनही दोन्ही शिपायांनी ढुंकूनही पाहिले नाही. पदाधिकारी दोन तास वाट पाहून परतले. प्रकरणी ग्रामसेवक व परिचरांची तक्रार करण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक ग्रामपंचायत कार्यालयात १५ जून रोजी सकाळी ११ वाजता समिती अध्यक्ष रामदास धुर्वे यांचे अध्यक्षतेखाली बोलविण्यात आली होती. बैठकीचे नोटीस परिचरामार्फत पदाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. त्यासाठी परिचरांना प्रती बैठक दिडशे रुपये स्व:खिश्यातुन दिले जातात, असे अध्यक्ष धुर्वे यांनी सागितले.बैठकीची वेळ झाली, अध्यक्षांसह पदाधिकारी नियोजित वेळेवर ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले. परिचरांनी ग्रामपचांयतचे कुलूप उघडलेले नव्हते. दोन्ही परिचर कुठे गेले म्हणून शोधाशोध सुरु झाली. फोन लावला गेला, परिचरांनी गावातील टोलीवर असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी ग्रामपंचायतला येण्यास नका दिला. कुलूप उघडण्यासही मनाई केली. तब्बल दोन तास पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर वाट पाहिली मात्र परिचर फिरकले नाही. समितीवर जणू बहिष्कार टाकल्यासारखी अवस्था दिसत होती. निवडणुकीची आचार संहिता सुरु असल्याचे कायदा आपल्या हातात, अश्याच तोऱ्यात ते वावरले.ग्रामसेवक अश्विन डोहळे यांच्या दुर्लक्षित धोरणांचा व कारभाराचा पाढा पदाधिकाऱ्यांकडून वाचला गेला. डोहळे ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी असून त्यामुळेच त्यांच्या बेजबाबदार कारभाराची चौकशी केली जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. प्रकरणी खंड विकास अधिकारी मोहाडी यांचेकडे तक्रार करण्यात आली. (वार्ताहर)