शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाल पाण्याचा जीवघेणा खेळ

By admin | Updated: July 10, 2017 00:14 IST

भंडारेकरांना दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मागील तीन दिवसांपासून नगर पालिका प्रशासनाकरवी वितरित ....

पालिकेची उदासीनता : नागरिक पिताहेत दूषित पाणी लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :भंडारेकरांना दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मागील तीन दिवसांपासून नगर पालिका प्रशासनाकरवी वितरित करण्यात येणारे पिण्याचे पाणी लाल स्वरुपात येत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दीड लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पाणी पुरवठ्याची जबाबदारी नगर पालिका प्रशासनावर आहे. जवळपास पाच दशकांपूर्वीची जीर्ण झालेल्या नळयोजनेच्या मार्फत शहरात पाणीपुरवठा केला जातो. बहुतांश जागाहून पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी लिकेज झाल्याने आधीच शहरवासीयांना दूषीत पाणीपुरवठा होत होता. यात पुन्हा नवीन बाब समोर आली आहे.भंडारा पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या वैनगंगा नदीच्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ निर्माण झाली आहे. परिणामी पाणी गढूळ झाल्याने तव्दतच जलशुध्दीकरण यंत्रणा नावापुरतीच उरल्याने मागील तीन दिवसांपासून शहरवासीयांना लाल रंगाच्या गढूळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. दुसरीकडे मध्यप्रदेश सीमावर्ती भागात पाऊस झाल्याने वैनगंगेच्या नदीपात्रात पावसाचा पाण्याचा शिरकाव झाला आहे. इकॉर्निया या जलपर्णी वनस्पतीचा विळखा वैनगंगा नदीपात्रात आहे. यात गाळामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे.शहरात दहा हजारांपेक्षा जास्त नळधारक असून ३५० पेक्षा अधिक सार्वजनिक नळ आहेत. या नळधारकांना पिण्याच्या पाण्याचा अशुद्ध पुरवठा होत असल्याने अनेकांनी नळाचे पाणी पिणे सोडून दिले आहे. आधी वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी येत होते. आता वीज पुरवठा खंडित होत नसला तरी पाणी येण्याचे प्रमाण काही प्रमाणात योग्य असले तरी ते अत्यंत दूषित असल्याने भंडारावासीयांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा आमच्या आरोग्याशी खेळ असल्याची भावना जनतेने व्यक्त केली आहे.आजार बळावण्याची भीतीदूषित पाण्यामुळे अतिसार, कावीळ, हैजा यासारखे आजार बळावण्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलावांसह विहिरींच्या पातळीत पुन्हा घट होत आहे. दुसरीकडे नगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अजूनपर्यंत पाणीपुरवठ्याचा भविष्यकालीन प्रस्ताव अंमलात येण्यास बराच कालावधी शिल्लक आहे.