शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आता तात्पुरती होणार शिक्षकांची नियुक्ती

By admin | Updated: December 27, 2014 01:10 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे.

मोहाडी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला दिले आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही बाब जिल्हा परिषदेला उशिरा कळली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत अनेक पदे रिक्त आहेत. माहोडी तालुक्यात पदवीधर शिक्षकांचे ३६ पदे रिक्त आहेत. या रिक्त शिक्षकांची जिल्हा परिषदेने नियुक्ती केलेली नाही. मोहाडी तालुक्यात विशेषत: इंग्रजी, विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांची गरज आहे. आरटीई कायद्यानुसार इयत्ता सहावी ते आठवी करीता बीएससीबीए किंवा बीएबीएड शिक्षक हवे आहेत. सहावी ते आठवीला बीएससी शिकविणाऱ्या शिक्षकांची मोहाडी तालुक्यात संख्या केवळ चार आहे. यामुळे विशेषत: गणित व विज्ञान विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान अधिकच होत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा सर्वांगिण गुणवत्तेत कमी पडत असल्याचे उशिरा पदाधिकाऱ्यांना समजले. जिल्हा परिषदेवर भार न ठेवता शाळा व्यवस्थापन समितीने आता तात्पूरत्या स्वरूपात रिक्त असलेल्या जागेवर शिक्षकांची नेमणूक करावी, असे पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) यांनी १७ डिसेंबर रोजी पत्र काढले. शाळा व्यवस्थापन समितीला नेमणूक करण्याच्या अधिकारावर निर्णय २१ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. इयत्ता ६ ते ८ वर ज्या विषयाची जागा रिक्त आहे त्या विषयाचेच शिखक तात्पुरत्या ३००० हजार रूपये प्रतिमाह मानधनावर नियुक्त केले जातील. या शिखकांची नियुक्ती ३० दिवस किंवा नियमित शिक्षकांची पदस्थापना होईपर्यंत होणार आहे. पद रिक्त असल्यास कामाच्या दिवशी पुरेसा खंड देवून पुन्हा नव्याने नियुक्ती शाळा समितीला करता येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)