शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

२७९३ करदात्या शेतकऱ्यांकडून पीएम किसान रकमेची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 05:00 IST

जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६३ लाख ६० हजार वसूल केले आहेत. त्यामुळे आता गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यात कृषी सन्मान योजना ही ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांमार्फत गावोगावी शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून राबवण्यात आली होती. मात्र त्यावेळी योजनेची अंमलबजावणी घाईघाईने करण्यात आल्याने अनेक आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता. 

ठळक मुद्दे१५०१ शेतकरी अपात्र : जिल्हा प्रशासनाकडून नोटीस, अपात्र शेतकऱ्यांकडूनही वसुली

संतोष जाधवरलोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फेब्रुवारी २०१९  मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवण्यास सुरुवात केली होती. या योजनेच्या प्रत्यक्ष कामास १ डिसेंबर २०१८ पासून सुरुवात करण्यात आली.  प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांना दर चार महिन्याला दोन हजार रुपये असे वर्षभरासाठी सहा हजार रुपये मदत देण्यात येते. मात्र या योजनेची सुरुवातीला अंमलबजावणी करताना घाईगडबड झाल्याने काही अपात्र शेतकरी तसेच इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर केंद्र सरकारने अशा अपात्र करदात्यांकडून ही वसुली करण्याचे प्रत्येक राज्यांना निर्देश दिले. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात आयकर भरणाऱ्या जिल्ह्यातील २७९३ शेतकऱ्यांना तर १५०१ अपात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची वसुली नोटीस पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत अपात्र शेतकऱ्यांकडून ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांकडून ६३ लाख ६० हजार वसूल जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६३ लाख ६० हजार वसूल केले आहेत. त्यामुळे आता गरजू आणि पात्र लाभार्थ्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. जिल्ह्यात कृषी सन्मान योजना ही ग्रामस्तरावरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांमार्फत गावोगावी शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करून राबवण्यात आली होती. मात्र त्यावेळी योजनेची अंमलबजावणी घाईघाईने करण्यात आल्याने अनेक आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतला होता. केंद्र सरकारच्या आदेशानंतर अशा अपात्र करदात्यांकडून वसुली करण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून ६३ लाखांची वसुली करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून     येत आहे. 

१५०१ शेतकरी पीएम किसान योजनेतून अपात्र 

पीएम किसान  योजनेमधून पंधराशे एक शेतकरी अपात्र झाले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही शेतकऱ्यांना संकटकाळात दिलासा देणारी योजना ठरली आहे. मात्र काही कारणांअभावी जिल्ह्यातील १५०१ शेतकरी अपात्र ठरले आहेत. अशा शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. 

मी भंडारा तालुक्यातील खरबी येथील अल्पभूधारक शेतकरी आहे. मला आतापर्यत पीएम किसान सन्मान योजनेमधून आठ हप्ते नियमितपणे मिळाले असून अगदी कोरोना संकटकाळात मला हे वार्षिक सहा हजाराची रक्कमही आधार देणारी ठरली. माझ्या भावाला पहिल्या वर्षी योजनेचा लाभ मिळालाच नाही मात्र त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर आता नियमितपणे त्याच्याही खात्यावर पैसे जमा होत आहेत. -दीपक गिऱ्हेपुंजे, अल्पभूधारक शेतकरी, खरबी नाका.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना