शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएममधील हेराफेरी पराभवाला कारणीभूत

By admin | Updated: December 22, 2016 00:49 IST

नुकतीच भंडारा नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने वापरलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून ठेवल्याने माझा पराभव झाला.

धनराज साठवणे यांचा आरोप : मशीनची तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी भंडारा : नुकतीच भंडारा नगरपालिकेची निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने वापरलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करून ठेवल्याने माझा पराभव झाला. त्यामुळे या निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व ईव्हीएम मशीनची तज्ज्ञाकडून तपासणी करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे पराभूत उमेदवार धनराज साठवणे यांनी केली आहे. केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे ईव्हीएम व्होटींग मशीनची तपासणी मतदानापुर्वी उमेदवारांना दाखविण्यात आलेली नाही. ईव्हीएम मशीनमध्ये पक्षाच्या दबावात येवून अधिकाऱ्यांनी गडबडी करून ठेवल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे माझ्या मताच्या बेरजेच मोठी तफावत आली असून या सर्व मशीनमुळेच माझा पराभव झाला, असा आरोप साठवणे यांनी लावला आहे. शासन आदेशाची व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भंडारा शहरात अवहेलना झाली असून मतदानापुर्वी ईव्हीएम मशीनची टेस्टींग करण्यात आली नाही. मतदान मशीन ही बरोबर सुरू आहे. याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. भंडारा न.प. च्या निवडणुकीत वापरण्यात आलेल्या संपूर्ण प्रभागातील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आहे. त्यांचा संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झाला आहे. मतदानात घोळ निमार्ण झाला असून या मशीनची तपासणी करावी. माझ्या प्रभागात व लगतच्या प्रभागात मतदारांनी मला भरघोष मत दिले. ८० टक्के मतदान माझ्या बाजूने झाले असताना मला फार कमी मतदान झाले तर विरोधी पक्षाच्या उमेदवारांना जास्त मतदान मिळाले. ईव्हीएम मशीन उमेदवारांना किंवा त्यांच्या प्रतिनिधींना मतदानापुर्वी तपासणी करून दाखविणे गरजेचे आहे. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी व प्रशासनाने याची अवहेलना केली. तज्ज्ञांकडून ईव्हीएम मशीनची तपासणी करून ती मशीन कोणत्या कंपनीची आहे, टेस्टींग रिपोर्ट तसेच आॅडिट रिपोर्ट देण्यात यावा या करीता लागणारा संपूर्ण खर्च मी करायला तयार असून माझ्यावर झालेला अन्याय यासाठी मला न्याय मिळावा या दृष्टीने प्रशासनाने व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे, अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. (शहर प्रतिनिधी)