शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये बंडाळी

By admin | Updated: July 1, 2015 00:54 IST

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत काँग्रेसमधील उमेदवारी वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता.

अंतर्गत वादाचा परिणाम : उमेदवारांमध्ये नाराजीचा सूरभंडारा : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत काँग्रेसमधील उमेदवारी वाटपाचा तिढा सुटलेला नव्हता. अंतर्गत बंडाळीमुळे उमेदवारी वाटप करताना काँग्रेस पक्षश्रेष्ठींची चांगलीच दमछाक झाली असून अंतर्गत बंडाळीचा आता वाद विकोपाला पोहोचला आहे. उमेदवारी वाटप करण्यापूर्वी सर्व पक्षांप्रमाणे काँग्रेसमध्येही मुलाखती पार पडल्या. त्यावेळी अन्य पक्षाच्या तुलनेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी मुलाखती देणारे सर्वाधिक उमेदवार होते. उमेदवारी वाटपाच्या निर्णय प्रक्रियेत विधानसभा क्षेत्रात काँग्रेसच्या चिन्हावर लढलेल्या पदाधिकाऱ्यांची आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची मते जाणून घेण्यात आली होती. दरम्यान, उमेदवारी वाटप करताना पक्षश्रेष्ठीनी काही ठिकाणी विशिष्ट उमेदवारांचा आग्रह धरला. त्यानंतर निवडणूक चिन्ह वाटप होण्याच्या दिवशी लाखनी तालुक्यातील एका जागेवर निर्णय घेण्याचे ठरले. त्यानंतर त्या उमेदवाराला पक्ष प्रभारीकडून एबी फार्म देण्यात आले. याची भणक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्याला लागताच ती उमेदवारी रद्द करण्याचा आटापिटा सुरू झाला. यात उमेदवारी वाटप करताना प्रभारी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यामुळे प्रचारासाठी जिल्ह्यात आलेले नेते प्रचार अर्ध्यावर सोडून परत गेले. प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाला बच्चन विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नितीन राऊत, विखे पाटील विजय वडेट्टीवार हे प्रचारासाठी येणार होते. परंतु हे नेते आता प्रचारासाठी येणार की नाही, याबद्दल काँग्रेसच्याच गोटात साशंकता आहे.(जिल्हा प्रतिनिधी)