मन परिवर्तन सभा : साजू लुकोस यांचे प्रतिपादनभंडारा : आपण केलेल्या पापाची कबुली करा, मनातून खरा पश्चाताप करून पुन्हा अपराध न करण्याचा निर्धार करा. आपल्या मनाच्या विवेकाने चांगले वाईट याचा निर्णय घ्या. असे प्रतिपादन साजू लुकोस यांनी केले. जिल्हा कारागृहात आयोजित मन परिवर्तन सभेत ते कैद्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी मनिष गोस्वामी यांनी कैद्यांना आपल्या डोक्यातून नकारात्मक विचार काढा व सकारात्मक विचार ठेवा. सर्व चुकीची कामे वाईट मनोवृत्तीतूनच होते. म्हणून मनपरिवर्तन करा असा सल्ला त्यांनी दिला. कारागृह अधीक्षक अनुपकुमार कुमारे यांनी कारागृहातील कैदी बांधवांचे मनपरिवर्तनाची गरज असल्याचे सांगितले. यावेळी साजू लुकोस यांनी कैद्यांना अपराध न करण्याची शपथ दिली. कार्यक्रमात विनोद बागडे, आनंद भाई यांनी सहकार्य केले. यावेळी कारागृहातील २५० कैदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
मनातून खरा पश्चाताप करा
By admin | Updated: December 18, 2015 01:03 IST