शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्त्यावर पुन्हा पक्के बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST

सिहोरा परिसरातील गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहेत. मुरली गावात राज्य मार्ग ३५९ ते मुरली मांगली गावांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्ता बांधकामाकरिता २ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तिरोडा येथील एका कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीमार्फत गावात रस्ता बांधकाम सुरु करण्यात आले आहैे.

ठळक मुद्देसरपंच अनभिज्ञ : मुरली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : ग्रामपंचायती अंतर्गत गावात बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सीमेंट रस्ता तयार करण्यात येत असल्याने गावकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा प्रकार मुरली गावात उघडकीस आलेला आहे.सिहोरा परिसरातील गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत खडीकरण, डांबरीकरण आणि सिमेंट रस्ता तयार करण्यात येत आहेत. मुरली गावात राज्य मार्ग ३५९ ते मुरली मांगली गावांना जोडणाऱ्या दोन किलोमीटर अंतराच्या रस्ता बांधकामाकरिता २ कोटी ८४ लाख ७२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तिरोडा येथील एका कंपनीला कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंपनीमार्फत गावात रस्ता बांधकाम सुरु करण्यात आले आहैे. या मार्गावर ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. याच रस्त्यावर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सीमेंट रस्ता तयार करण्यात येत आहे. सीमेंट रस्ता बांधकामाकरिता अन्य जागा उपलब्ध असताना कंत्राटदाराने जुन्याच सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ता तयार करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. यामुळे गावकऱ्यांचे भुवया उंचाविल्या आहेत. ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची गुणवत्ता किती वर्षाची होती. ग्रामपंचायतने गावातच दोन वर्षात सिमेंट रस्ता तयार केला आहे. या रस्त्यावर व्हीरिंग कोड तयार करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. गावात कामे सुरु असून या कामाची साधी नकल प्रत ग्रामपंचायतकडे उपलब्ध नाही. यामुळे कामाचे गुणवत्ता संदर्भात गावकरी ग्रामसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करीत गावकरी ग्रामसभेत वारंवार प्रश्न उपस्थित करीत असल्याने सरपंचाचे टेंशन वाढत आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत पाच वर्षपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीकरिता कंपनी करारबद्ध असल्याचे नमूद असले तरी नंतर कुणी ढुंकूनही पाहत नाही. या योजनेत गावात घोळ करण्यात येत आहे. अन्य जागेत सिमेंट रस्ता तयार केला असता तर गावकºयांना आणखी एक नवीन सिमेंट रस्ता मिळाला असता असा सूर आहे.ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्ते दुरुस्तीची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. गावात सिमेंट रस्त्यावर दुरुस्तीकरिता सिमेंट रस्ता तयार करण्यात येत असताना साधी माहिती सरपंच यांना देण्यात आली नाही. गावात कामे करणाऱ्या बाहेरील कंपन्या कामे होताच निघून जात आहेत. निकृष्ट बांधकामाचा पुन्हा गावकऱ्यांना सोसावा लागत आहे.रुपेरा गावात अडविले कामरुपेरा गावात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावर पुन्हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिमेंट रस्ता तयार करण्याकरिता पुढाकार घेण्यात आले असता अडविण्यात आले आहे. ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेला सिमेंट रस्ता चोरीला जाण्याची भीती निर्माण झाल्याने ग्रामपंचायत अंतर्गत नवीन जागेत सिमेंट रस्ता बांधकाम करण्याचे बजाविले आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कंत्राटदार आणि यंत्रणा साटेलोटे करीत दिशाभूल करीत असल्याचे या गावात दिसून आले होते. यानंतर कंत्राटदारांनी रस्ता तयार केले नाही.मुरली गावात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कामे सुरु असली तरी अंदाजपत्रक प्राप्त झाले नाही. कामाची गुणवत्ता माहीत नाही.-राजेश बारमाटे, सरपंच मुरली.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग