शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकाधारक स्वस्त धान्यांपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 21:57 IST

जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार विविध प्रकारच्या शिधापत्रिकांसाठी नवनवीन सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात येत असल्यामुळे अनेकांना स्वस्त धान्याची उचल करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसॉफ्टवेअर ठरताहे त्रासदायक : अन्न पुरवठा विभागाविरुद्ध शिधापत्रिकाधारकांचा रोष, स्वस्त धान्यासाठी रांगा

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीनुसार विविध प्रकारच्या शिधापत्रिकांसाठी नवनवीन सॉफ्टवेअरमध्ये समाविष्ट करण्यात येत असल्यामुळे अनेकांना स्वस्त धान्याची उचल करण्यास कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शिधापत्रिकाधारकांनी अन्न पुरवठा विभागाविरुध्द रोष व्यक्त केला आहे.याबाबत असे की, शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, या उद्देशाने नवनवीन आधुनिक सॉफ्टवेअर विकसीत होत आहे. शासन विविध कार्यालयात या सॉफ्टवेअरचा उपयोग करीत आहे. याचा अनेकांना फायदा जरी होत असला तरी हे सॉफ्टवेअर तितकेच घातक व त्रासदायक ठरत असल्याच्या तक्रारीत वाढ होत आहे. याची प्रचिती सार्वजनिक वितरण प्रणालीवर दिसून येत आहे. माहितीनुसार, मागील महिन्यात ठाणा पेट्रोलपंप येथील शिधापत्रिकाधारकांना 'पॉस मशिन'द्वारे धान्याचे वाटप करण्यात आले. मात्र मार्च महिन्यात तीच कार्डधारक महिला स्वस्त धान्य घ्यायला आली असता 'पॉस मशीन'द्वारे महिलांच्या कोणत्याही बोटाचे ठसे आधारकार्डनुसार जुळत नाही. परिणामी त्या महिलेने आपल्या मुलीला बोलावून तिच्या बोटाचे ठसे त्या यंत्रामध्ये जुळवण्याचा प्रयत्न केले असता तेही जुळत नाही. अखेर तासभरानंतर सदर महिलेला दुसऱ्या रजीस्टरवर धान्याची उचल करीत नोंद करण्यात आली. प्रत्यक्ष शिधापत्रिकाधारकांकडून अशी ओरड आहे की तीन ते चार वेळा सर्व कुटुंबाचे आधार व बँकेचे खाते पुस्तीकेची झेरॉक्स प्रत 'लिंकींग' करीता दिले असता कुटुंब प्रमुखाचे नावासमोर दुसरेच आधार कार्ड लिंकींग झाल्याची ओरड आहे. याविषयी तहसील कार्यालयात माहिती जाणून घेतली असता संबधित कार्ड बोगस असल्याचे सांगण्यात आले. दुसरी बाब म्हणजे महिना दोन महिन्यानंतर नवीन सॉफ्टवेअर समाविष्ट झाल्याने अनेकांना 'लिंक फेल' व आधार क्रमांक जुळवाजुळव होत नसल्याने तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. परिणामी कार्डधारकांचा धान्य वितरीत करणाऱ्यावर रोष व्यक्त करीत असतात.सरद सार्वजनिक वितरण धान्य दुकानात लागलेले थम मशीनमध्ये नवीन सॉफ्टवेअरमुळे कार्ड धारकांचे थम जुळत नाही. याकरिता धान्य दुकानात वरिष्ठ तांत्रिक कर्मचाºयाला पाचारण करून वितरण व्यवस्था सुरळीत करण्यात येईल. प्रत्यक्ष प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे.-चंद्रशेखर वानखेडे, अन्न पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय भंडारा