शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी मुदतवाढ देण्यासाठी रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:24 IST

लाखांदूर : आधारभूत किमत खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी सकाळी ११ वाजता ...

लाखांदूर : आधारभूत किमत खरेदी केंद्रावर उन्हाळी धानाची खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील बारव्हा येथे बुधवारी सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी केले. शेतकऱ्यांनी लाखांदूर ते साकोली मार्गावर ठिय्या दिल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार लाखांदूर तालुक्यात १६ केंद्रावर धान खरेदी सुरू करण्यात आली होती. मात्र सुरुवातीपासून विविध कारणांमुळे शेकडो शेतकरी धान विक्रीपासून वंचित आहेत. आता बारदान्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच धान खरेदीची अंतिम तारीख ३० जून आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांचा धान खरेदी होणे शक्य नाही. त्यासाठी धान खरेदीला मुदतवाढ देण्याच्या मागणीसाठी बुधवारी लाखांदूर ते साकोली मार्गावर बारव्हा येथे रास्तारोको करण्यात आला. माजी समाजकल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात गोपाल झोडे, धनू लंजे, लालचंद बुद्धे, गुलाब झोडे, राजेंद्र मेश्राम, मोरेश्वर भैसारे, मुकेश कोरे, पतीराम झोडे, हिरालाल बगमारे, सुखदेव लंजे, आदेश फुंडे, रवी डोंगरवार, घनश्याम लंजे, ऊल्हास झोडे, नितीन मेश्राम, महादेव झोडे, रघुनाथ लंजे, रेवा शेंद्रे, टिकाराम गायकवाड, बाळकृष्ण कोचे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

बॉक्स

येत्या दोन दिवसांत धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ

रास्ता रोको आंदोलनला नायब तहसीलदार देवीदास पाथोडे, दिघोरीचे ठाणेदार नीलेश गावंडे, विजयलक्ष्मी राईस मिलचे सचिव आशिष बुरडे, आभास बेरोजगार संस्थेचे संचालक बाळू दहिवले यांनी भेट दिली. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड व जिल्हा पणन अधिकारी गणेश खर्चे यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता येत्या दोन दिवसांत धान खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.

===Photopath===

300621\img-20210630-wa0027.jpg

===Caption===

रास्ता रोको आंदोलनात ऊपस्थित आंदोलनकर्ते