शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बोरगाव येथे विहिरीत आढळला दुर्मिळ खवल्या मांजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

खवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जीभ वापरून तो आपले भक्ष्य पकडतो. नैसर्गिक अधिवास संपत असल्याने खवल्या मांजराचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेकदा त्याची शिकारही केली जाते.

ठळक मुद्देवनविभागाच्या सुपूर्द करून जंगलात सोडले, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सातपुडा पर्वतरांगातील ग्रीन व्हॅली चांदपूर परिसरातील बोरगाव शिवारातील एका विहिरीत दुर्मिळ खवल्या मांजर शनिवारी सकाळी आढळून आला. या मांजराला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. वनविभागाच्या मदतीने खवल्या मांजराला ताब्यात घेऊन त्याला जंगलात सोडण्यात आले. चांदपूर परिसरात पहिल्यांदाच खवल्या मांजराचे दर्शन नागरिकांना झाले.ग्रीन व्हॅली चांदपूर परिसरातील घनदाट जंगलात वन्य प्राण्यांचा मुक्त संचार आहे. अनेक प्रजातींचे वन्य प्राणी या जंगलात आढळात आहेत. अनेक हिंस्त्र व तृणभक्षी प्राण्यांचे दर्शन गावकऱ्यांना होत आहे. सध्या शेतशिवारात खरीप हंगामातील रोवणीची कामे सुरु आहेत. त्यामुळे शेतकरी सकाळपासूनच शेतात जातात. बोरगाव येथील शेतकरी शनिवारी शेतात गेले होते. याच गावातील प्रितीलाल पारधी आपल्या शेतातील विहिरीवर गेले असता त्यांना आतमध्ये दुर्मिळ असलेला खवल्या मांजर दिसला. त्यांनी ही माहिती शेतकऱ्यांना दिली.खवल्या मांजराची प्रजाती विलूप्त होण्याच्या मार्गावर असून या परिसरात प्रथमच त्याचे दर्शन झाले. खवल्या मांजराला वनविभागाच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हरदोली वनविभाग कार्यालयाचे क्षेत्र सहाय्यक एच.के. येरणे यांना माहिती देण्यात आली. बीट रक्षक एस.ए. गायकवाड, ए.जे. वासनिक, एन.एस. हुकरे आणि सुमीत देव्हारे शेतशिवारात आले. त्यानंतर खवल्या मांजराला ताब्यात घेऊन वनकार्यालयात आणण्यात आले. त्या ठिकाणी या खवल्या मांजराची वनविभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली.दहा किलो वजनाचे खवल्या मांजर असून अतिशय दुर्मिळ प्रजाती म्हणून ओळखली जाते. यानंतर वनविभागाच्या चमूने शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर खवल्या मांजराला जंगलात सोडून दिले. खवल्या मांजर बोरगाव परिसरात आढळल्याची माहिती होताच परिसरातील गावकºयांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर गर्दी केली होती. खवल्या मांजराची चर्चा दिवसभर चांदपूर परिसरात शनिवारी सुरु होती.बोरगाव येथील शेतशिवारातील विहिरीत दुर्मिळ खवल्या मांजर आढळल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेण्यात आले. खवल्या मांजराला कोणतीही जखम वा दुखापत झालेली नव्हती. शासकीय सोपस्कार पूर्ण करून खवल्या मांजराला जंगलात सोडून देण्यात आले.- एच.के. येरणे, क्षेत्र सहाय्यक, हरदोलीमॅनीस प्रजातीचा सस्तन प्राणीखवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जीभ वापरून तो आपले भक्ष्य पकडतो. नैसर्गिक अधिवास संपत असल्याने खवल्या मांजराचे अस्तित्व धोक्यात आले असून अनेकदा त्याची शिकारही केली जाते. त्यामुळे खवल्या मांजराला संरक्षित प्राण्याच्या सूचित समाविष्ट करण्यात आले आहे. अतिशय लाजाळू असणारा खवल्या मांजर आता चांदपूर परिसरात आढळल्याने कुतूहलाचा विषय झाला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग