शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकरांचा हैदोस शेतकऱ्यांच्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:42 IST

धान पिकाने अंतिम टप्पा गाठला आहे. धान पीक पुढील पंधरा दिवसात कापणीला येत आहेत. अशातच रानडुकरांच्या हैदोसाने पीक जमीनदोस्त करीत सुमार नुकसान होत आहे. वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होत नाही. उपाययोजना नव्या तंत्राच्या असणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देधान पिकाचे नुकसान : उसाचे शेत व झुडपे झाली आश्रयस्थान

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : धान पिकाने अंतिम टप्पा गाठला आहे. धान पीक पुढील पंधरा दिवसात कापणीला येत आहेत. अशातच रानडुकरांच्या हैदोसाने पीक जमीनदोस्त करीत सुमार नुकसान होत आहे. वनविभाग सुस्त असल्याने कार्यवाही होत नाही. उपाययोजना नव्या तंत्राच्या असणे काळाची गरज आहे.लाखनी तालुक्यातील पालांदूर मंडळ कृषी कार्यालया अंतर्गत सुमारे आठ हजार हेक्टरवर धान पीक जोमात आहे. परतीच्या पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने पुन्हा शेतकºयांची पाण्याकरीता पायपीट करावी लागत आहे. महावितरण शेतकºयांना रात्रीची वीज देत असल्याने शेतावर रात्रीला जावेच लागते. एकट्या शेतकºयाची हिम्मत होत नसल्याने मुलाला, पत्नीला सोबत करीत शेत गाठावे लागत आहे. हातात कंदिल, टॉर्च घेत डुकरांच्या भीतीने मोठा आवाज करीत मार्ग काढावा लागत आहे.मºहेगाव नाल्याकाठावरील झाडी झुडपात रानटी डुकरे दिवसाला लपून निवांत राहतात. शेतातील ऊसाच्या शेतात सुद्धा आश्रयीत राहून रात्रीला बेधुंद होत धान पिकावर तुटून पडतात. खाणे कमी व नुकसान अधिक होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.वनविभाग नुकसान भरपाई २५ टक्के सुद्धा होत नाही. कित्येक वर्षापासूनचे ठरलेल्या दरानेच नुकसान भरपाई तुटपूंजी मिळत आहे. शेतकºयांच्या वास्तव नुकसानीचे मुल्य मिळत नाही. वन्यजीव संरक्षण कायद्याने हात बांधल्याने डुकरांचे नियंत्रण अशक्य झाले आहे. ऐन तोंडावर असलेल्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.