शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

चित्ररथाद्वारे रोखरहित व्यवहारासंबंधी जागृती

By admin | Updated: January 12, 2017 00:27 IST

नोव्हेंबर रोजी देशभरात झालेल्या नोटबंदीनंतर नागरिकांनी रोखरहित व्यवहाराकडे (कॅशलेश) वळण्यासाठी निती आयोगाने विविध उपाय योजना आखल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाचा उपक्रम : पीओएस मशीनद्वारे डेमो, एलसीडीवर व्हिडिओद्वारे जागृतीभंडारा : नोव्हेंबर रोजी देशभरात झालेल्या नोटबंदीनंतर नागरिकांनी रोखरहित व्यवहाराकडे (कॅशलेश) वळण्यासाठी निती आयोगाने विविध उपाय योजना आखल्या आहेत. कॅशलेश महाराष्ट्र या संकल्पनेनुसार रोखरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी व जास्तीत जास्त नागरिकांना कॅशलेश व्यवहार अवगत व्हावे यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात चित्ररथाद्वारे जागृती करण्यात येणार आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी कॅशलेश जागृती चित्ररथाला हिरवी झेंडी दाखवून या अभियानाला सुरुवात केली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, लिड बँक व्यवस्थापक विजय बागडे व उमेश महतो उपस्थित होते. या चित्ररथावर एलसीडी व अद्यायावत माहिती असलेले फ्लेक्स लावण्यात आले आहेत. रोखरहित व्यवहार कसे करावे यासंबंधी चित्रफित (व्हीडीओ) दाखवून ग्रामीण भागातील नागरिकांची रोखरहित व्यवहारासंबंधी जागृती करण्यात येणार आहे. हा चित्ररथ ग्रामीण भागात १७ दिवस फिरणार आहे.यात प्रामुख्याने डिजीटल पेमेंट, युपीआय, बँक कार्ड, पॉईंट आॅफ सेल मशीन, ई-बटवा व आधारकार्ड एनेबल पेमेंट याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे. शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे पेमेंट आता कॅशलेश पध्दतीने करण्यचा शासनाचा आदेश आहे. या अनुषंगाने ग्रामीण भागातील नागरिक, अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांना रोखरहित व्यवहाराचे ज्ञान व्हावे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने या चित्ररथाचे अयोजन करण्यात येत आहे.कॅशलेश होतांना नागरिक आपले दैनंदिन आर्थिक व्यवहार पाच सोप्या पध्दतीने करु शकतात. यासाठी आपला मोबाईल आपला बटवा होणार आहे. यात युपीआय अ‍ॅप्स, युएसएसडी पध्दती, ई-वॉलेट, बँक कार्डस व पॉईंट आॅफ सेल मशिन आणि आधार एनेबल पेमेंट पध्दतीचा समावेश आहे. कॅशलेश महाराष्ट्रासाठी व नागरिकांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यासाठी जिल्हयातील गावागावात हा चित्ररथ फिरणार आहे.या कॅशलेश व्यवहाराच्या पाचही मुद्यांची माहिती या चित्ररथावर देण्यात आली आहे. पहिल्या तीन मुद्याबाबत म्हणजेच युनिफाइड पेमेंट इंटरफेस (वढक), ई-वॉलेट, कार्ड्स, पीओएस, स्मार्ट मोबाईल व इंटरनेट सुविधा आवश्यक असून उर्वरित दोन मुद्याबाबत म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (अएढर), अविस्तृत पूरक सेवा माहिती (यूएसएसडी) स्मार्ट मोबाईल व इंटरनेटची आवश्यकता नसणार आहे. विशेष म्हणजे पीओएस मशीनद्वारे कार्ड स्वाईप करुन कसे व्यवहार करायचे याबाबत बँक प्रतिनिधी नागरिकांना डेमो दाखविणार आहे. हा चित्ररथ गावांसह काही महाविद्यालयातही जाणार आहे. हा चित्ररथ जेव्हा आपल्या गावात येईल तेव्हा नागरिकांनी रोखरहित व्यवहाराची कार्यप्रणाली समजावून घेवून कॅशलेश अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी यावेळी केले. (नगर प्रतिनिधी)