शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रामपूर-आंबगड पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:02 IST

रस्ते गावांना जोडतात. ग्रामीण रस्ते दर्जात्मक असावे याकरीता शासन प्रयत्नशील आहे. रामपूर ते आंबागड गावादरम्यान रस्त्यावरील पूलाला मोठे भगदाड पडले आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचा जीव धोक्यात : कारवाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रस्ते गावांना जोडतात. ग्रामीण रस्ते दर्जात्मक असावे याकरीता शासन प्रयत्नशील आहे. रामपूर ते आंबागड गावादरम्यान रस्त्यावरील पूलाला मोठे भगदाड पडले आहे. सुमारे सहा महिन्यापूर्वी हा पूल तयार केला होता. पूलाची स्थिती पाहून नियमानुसार व गुणवत्तापूर्वक कामे झाली असतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात रामपूर ते आंबागड गावाला जोडणारा एका रस्त्यावर लहान पूल तयार करण्यात आला. या पूलाला सध्या मोठे भगदाड पडले आहे. भगदाड मोठा असून पांढरे सिमेंट तिथे दिसते. रहदारीचा हा मार्ग असून सदर रस्ता मृत्यूमार्ग ठरला आहे. सुमारे दोन ते अडीच फुटाचा हा खड्डा आहे. सहा महिन्यापूर्वी हे काम करण्यात आले होते अशी माहिती आहे. सिमेंट काँकीटच्या हा पूल असून सहा महिन्यात पूलाला भगदाड कसे पडले हा संशोधनाचा विषय आहे. संबंधित कंत्रादाराने दर्जात्मक व गुणवत्तापूर्वक कामे केली नाही त्याचा हा उत्तम नमूनाच म्हणावा लागेल. संबंधित विभागाच्या अभियंत्याने काय पाहणी व निरीक्षण केले असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. न पाहताच सर्व कामे सोयस्कार येथे पार कशी पडली. कर्तव्य न बजावणाºया संबंधित अभियंता व कंत्राटदारावर नियमानुसार कारवाईची गरज आहे. येथून मार्गकमण करणाºयांचा जीव धोक्यात असूनही अद्याप कारवाई झाली नाही, हे विशेष.