शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

भंडाऱ्यात रामचंद्र अवसरे यांनी मारली बाजी

By admin | Updated: October 19, 2014 23:17 IST

एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला व त्यावनंतर शिवसेनेचा भगवा फडकलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजपने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खिंडार पाडले आहे. जिलञह्यातील तिन्ही विधानसभेच्या

भंडारा : एकेकाळच्या काँग्रेसचा बालेकिल्ला व त्यावनंतर शिवसेनेचा भगवा फडकलेल्या भंडारा जिल्ह्यात भाजपने विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खिंडार पाडले आहे. जिलञह्यातील तिन्ही विधानसभेच्या जागांवर भाजपने कब्जा केला आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रातून अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी दणदणीत मते घेऊन विजय संपादन केला. परिणामी विजयी झालेल्या खेम्यात आनंदाची लाट तर दुसरीकडे पराभवाचे दु:ख चेहऱ्यावर झळकत होते. रामचंद्र अवसरे हे ३६ हजार ७३२ मतांनी विजयी झाले. सकाळी ८ वाजतापासून भंडारा शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या पोलीस बहुउद्देशिय सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. भंडारा विधानसभेचे निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. संपत खिल्लारी यांच्यासह निवडणुक निरीक्षक मोहनलाल व वरिष्ठ निवडणुक अधिकारी मंचावर उपस्थित होते. राऊंडनिहाय मतमोजणीची घोषणा करण्यात येत होती. पहिल्या राऊंडपासुनच भाजपचे अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतरच्या प्रत्येक राऊंडला त्याच्या मतमोजणीचा आलेख अन्य उमेदवारांच्या तुलनेत वाढत जात होता. निवडणुक अधिकारी मतमोजणीची घोषणा करताच बाहेर उपस्थित भाजप कार्यकर्ते एकच जल्लोष करीत होते. २३ पैकी बहुतांश राऊंड आटोपल्यावर अ‍ॅड. अवसरे यांना मिळालेल्या मतांचा टप्पा फार मोठ्या अंतराचा असल्याने ते हमखास निवडून येतील याचा पक्का अंदाज बांधून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली. दुसरीकडे बसपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या चेहऱ्यावरत हळूहळू नैराश्य पसरत असल्याचे जाणवले. निवडणुकीत जय-पराजय होईलच ही बाब नक्की असतेच. आणि त्यामुळेच मतदान परिसरात कुठे खुशी तर कुठे गमचा माहोल दिसून आला.दि. १५ आॅक्टोबर रोजी मतदान झाले होते. भंडारा विधानसभा क्षेत्रात भंडारा आणि पवनी तालुक्याचा समावेश होतो. या विधानसभा क्षेत्रात तीन लक्ष ४१ हजार १९८ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या १ लक्ष ७२ हजार ४८६ तर महिला मतदारांची संख्या १ लक्ष ६७ हजार ५७५ इतकी आहे. यापैकी २ लक्ष ३२ हजार २९४ मते वैध ठरली. १६२१ मतदारांनी नोटाला पसंती दर्शविली. भंडारा विधानसभा क्षेत्रात एकूण मतदान २ लक्ष ३३ हजार ९१५ इतके झाले. या निवडणुकीत भाजपचे अवसरे यांना ८३ हजार ४०८ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावर बसपाच्या देवांगणा गाढवे राहिल्या. त्यांना ४६ हजार ६७६ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर राहिले. त्यांना ४२ हजार ७६६ मते प्राप्त झाली. चौथ्या क्रमांकावर काँग्रेसचे युवराज वासनिक तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सच्चिदानंद फुलेकर राहिले. दोघांना अनुक्रमे ३० हजार ६५५ व १५ हजार २४३ मते मिळाली. या विधानसभा क्षेत्रातून एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी अकरा उमेदवारांना तीन आकडीच मते मिळाली. चार उमेदवारांना चार आकड्यांचा पल्ला गाठता आला. रामचंद्र अवसरे हे ३६ हजार ७३२ मतांनी विजयी झाले. रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भंडारा विधानसभा क्षेत्राचा निकाल घोषित केला व अवसरे यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. (प्रतिनिधी)