शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकसभेला उसळली गर्दी; जागरुकतेवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 01:25 IST

शाळेतील सभा म्हटले की ओढूनताणून बोटावर मोजण्याइतकी पालकांची उपस्थिती राहते.

खराशी येथील जि.प.शाळा : १४७ विद्यार्थी व १८० पालकांची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शाळेतील सभा म्हटले की ओढूनताणून बोटावर मोजण्याइतकी पालकांची उपस्थिती राहते. मात्र या परिस्थितीला अपवाद ठरते लाखनी तालुक्यातील जिल्हा परिषद खराशीची शाळा या शाळेत १४७ विद्यार्थी संख्या असतानाही १८० पालकांनी उपस्थिती लावून पालक सभेचे महत्त्व जाणले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची अंमलबजावणी राज्यातील सर्वच शाळांमध्ये सुरू आहे. मात्र या प्रगतीचा उदयच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी शाळेतून झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, अशी शैक्षणिक प्रगती या शाळेच्या शिक्षकांनी घडवून आणली आहे.शाळा म्हटले की, विद्यार्थी घडविणे हा महत्त्वाचा मुद्दा. यासोबतच पालकांचीही जागरुकता गरजेची असते. एरवी अनेक शाळांमध्ये पालक सभेला पालकांची उपस्थिती नगण्य असते. मात्र खराशी जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद ठरली आहे. शैक्षणिक सत्र नुकतेच सुरू झाले आहे. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक मुबारक सैयद यांनी पालकांची पहिलीच सभा बोलाविली. शाळेत १४७ विद्यार्थी संख्या आहे. त्यामुळे १४७ पालकांची उपस्थिती गरजेची होती. मात्र ही उपस्थिती संख्या १८० वर पोहोचल्याने छोट्याशा खराशी गावातील पालक त्यांच्या मुलाच्या शिक्षणाबद्दल किती जागरूक आहे यावरूनच दिसून येते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष थालिराम बावने, सदस्य रत्नाकर नागलवाडे, ताराचंद जगनाडे, सुलभा मेश्राम, ललीता सेलोकर, दुधराम झलके, सूर्यवंशी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी पालकांचे समुपदेशन करण्यात आले. या सभेत नवीन पालकांचे स्वागत करण्यात आले, विद्यार्थी बँकेची चर्चा व मार्गदर्शन, शालेय साहित्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांचा गृहपाठ करून घेण्याबाबत जागरूकता, पालकांच्या शंकांचे समाधान आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांना जागरूक करण्यात आले. या सभेला शाळेचे शिक्षक जयंतकुमार खंडाईत, राम चाचेरे, दुर्गा टेकाम, तारा कांबळे, अमोल बावणे, बेबी आठवले आदींची उपस्थिती होती.