शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

रक्षाबंधन-सुरक्षाबंधन सोहळा उत्साहात

By admin | Updated: August 20, 2016 00:26 IST

रक्षाबंधनाचे औचित्य साधून भंडारा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, क्रिएटिव्ह ग्रुप भंडारा यांनी काल, गुरुवार रोजी ...

वाहतूक नियमांचे धडे: पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, क्रिएटिव्ह ग्रुपचा उपक्रमभंडारा : रक्षाबंधनाचे औचित्य साधून भंडारा पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा, क्रिएटिव्ह ग्रुप भंडारा यांनी काल, गुरुवार रोजी त्रिमुर्ती चौक येथे रक्षाबंधन - सुरक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन केले. बहिण भावाला रक्षाबंधनाच्या वेळी राखी बांधून ओवाळणीमध्ये तिच्या सुरक्षीततेकरिता बहिणीला सुरक्षेचे वचन देतो. त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस आपणास राखी बांधून आपणाकडून वाहतुकीचे नियम समजावुन सुरक्षेची हमी देतो. पोलिसांनी चालकांना राखी बांधुन त्यावेळी घेवुन येणारे जाणारे वाहन चालकांना राखी बांधुन वाहतुकीचे नियम समजावुन सांगितले. अपघातापासुन जनतेचे संरक्षण करण्याचे बंधन मागणे अशी या कार्यक्रमाची संकल्पना होती.कार्यक्रमाला पोलीस अधिक्षक विनीता साहू प्रमुख्याने उपस्थित होत्या. रस्ते अपघातामध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू होत असल्याची खंत व्यक्त केली. हा धागा केवळ नात्याचा किंवा प्रेमाचा नसून नात्याच्या पलिकडे जावुन एक अस्वस्त, शास्वत, अभयदान, अक्षय दान, आज आम्ही ओवाळणीत मागत आहोत. वाहतूक नियमांचे बंधनाविषयी चिंतन सर्वांच्या आयुष्याला बळकटी देईल. असे प्रवाशांना सांगण्यात आले.वाहन वापरतांना वाहनाचे वेगावर नियंत्रण, मद्यप्राशन करुन वाहन चालविणार नाही, दुचाकीवर हेल्मेटचा वापर करावा इत्यादी वाहतुकीच्या नियमांना समजुन घेईल व पालन करणार, असे क्रिएटीव्ह ग्रुप यांनी अपघात घडण्याची वेगवेगळी कारणे विषद करणारी नाटीका सादर केली. पोलीस विभागातील महिला पोलिसांनी चालकांना राखी बांधून वाहतूक नियमाबाबत घोषवाक्य असलेली पत्रके वाटण्यात आली. कार्यक्रमाला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निमजे, पोलीस उपधिक्षक धूसर, पोलीस निरीक्षक कोलवाडकर, खंडारे, लोळे, हवालदार कठाणे, कळमकर, शिपाई हुमणे, निरज साबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक राऊत, संचालन क्रिएटीव्ह ग्रुपच्या स्मिता गालफाडे यांनी केले. आभार प्रदर्शन क्रिएटिव्ह ग्रुपचे ठवकर यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)