शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायासाठी राजेगाव वासीयांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 01:07 IST

तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

ठळक मुद्देअशोक लेलँड व्यवस्थापनाची अरेरावी : २६ एकरातील अतिक्रमण हटविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील राजेगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या अशोक लेलँड कारखाणा व्यवस्थापनाने चुकीच्या पध्दतीने २६ एकर जमीन बळकावून अनाधिकृत अतिक्रमण केल्याने ते हटविण्यात यावे, या मागणीसाठी राजेगाव वासीयांनी बुधवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चेकरी व व्यवस्थापनामध्ये वाद समोपचाराने न मिटविता व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्याने अरेरावी केल्यामुळे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.दुपारी शेकडो राजेगाववासी व परिसरातील नागरिक येथील जलाराम मंगल कार्यालयासमोर एकत्र आले. तिथून घोषणाबाजी करीत थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा धडकला. येथे मोर्चाचे रुपांतर सभेत करण्यात आले. सभेला सरपंच अनिता शेंडे, नरेश शेंडे, कुंजन शेंडे, मनोहर सार्वे, शशिकांत भोयर, दिनेश वासनिक, भानुदास सार्वे, तुळशीराम गेडाम, दिलीप मोटघरे, इंजि. त्र्यंबक घरडे, संजीव भांबोरे, शालीक गंथाडे, शारदा गथांडे, तुकाराम झलके आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, अशोक लेलँड कंपनीने राजेगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेली जमीन अतिक्रमणाच्या माध्यमातून हडप केली आहे, असा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट आहे.या जमिनीसंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी अशोक लेलँडने २६ एकर जमीन ही एमआयडीसीची नसल्याची यापुर्वीच स्पष्ट केले आहे. अतिक्रमणाच्या मुद्यावर राजेगावच्या पदाधिकाऱ्यांसोबत कारखाना व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करुन तोडगा काढावा, यासाठी अनेकदा सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र कारखाना व्यवस्थापनाचा कोणताही अधिकारी सभेला उपस्थित राहत नाही. उलट अरेरावीची उत्तरे दिले जात आहे.याविषयी जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून न्यायाची मागणी करण्यात आली. मात्र न्याय मिळत नसल्याने राजेगाव वासीयांनी बुधवारला धडक मोर्चा काढला. सायंकाळी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवून मागण्यांचे निवेदन सोपविले.बोरडकरविरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवाअतिक्रमणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सरपंच अनिता शेंडे यांनी कारखाना व्यवस्थापकांना ग्रामपंचायत येथे येण्याचे आमंत्रण दिले. मात्र व्यवस्थापकाने जातीवाचक शब्द बोलून अपमानीत केले आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवदेनातून केली आहे. मोर्चेकऱ्यांत राजेगाव एमआयडी परिसरातील शेकडो नागरिक सहभागी झाले.आतापर्यंत झालेल्या सभांमध्ये राजेगाववासीयांचे बारा-तेरा प्रतिनिधी, कारखान्याकडून चार-पाच प्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाच्या पाच-सहा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चर्चा झालेली आहे. सरपंचांची जातच माहित नसून त्यांना शिवीगाळ केली हे म्हणणे तथ्यहिन आहे.-अरविंद बोरडकर, व्यवस्थापक, अशोक लेलँण्ड कारखाना, गडेगाव.

टॅग्स :Morchaमोर्चा