शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:03 IST

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : भंडारा येथे आढावा बैठक, विधानसभा निवडणूक स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये कोणताही मतदार हा मतदानापासून वंचित राहू नये, याकरिता ग्रामस्तरावर व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ मध्ये स्विप कार्यक्रमाची जनजागृतीबाबत आढावा बैठक शुक्रवारी पार पडली.त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी निवडणूक प्रमोद भूसारी, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, तहसीलदार अक्षय पोयाम आदींची उपस्थिती होती. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे वतीने मतदान प्रक्रीयेची व्यापक जनजागृती करण्याबाबत कालबध्द कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. या कालबध्द कार्यक्रमाचा आढावा घेवून मतदान प्रक्रीयेची जनजागृती ग्रामस्तरापासून तर जिल्हास्तरापर्यंत व्यापक प्रमाणात व्हावी , अशा सुचना या प्रसंगी भंडारा, साकोली, तुमसर या विधानसभा क्षेत्राचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच तहसीलदार यांना केल्या.स्विप कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी विविध पातळीवर उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले. यामध्ये गावपातळीवर शाळांमध्ये संकल्प पत्रांचे वाटप व गोळा करणे, वॉर्ड सभा घेवून जनजागृती करणे, तसेच मतदान केंद्रावर मतदान यादीचे वाचन करणे, मतदारांना फोटो स्लीपचे वाटप करणे तसेच पोस्टर, बॅनर द्वारे जनजागृती करणे. ग्रामपंचातयस्तरावर ईव्हिएम-व्हिव्हिपॅट बाबत गैरसमज दूर करणे, महिला बचतगटांच्या माध्यमातून सभांचे आयोजन करून जनजागृती करावी, अशा सुचना दिल्या.तसेच तालुकास्तरावर महाविद्यालयामध्ये निवडणूक आणि मतदानासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन, संकल्प पत्रांचे वाटप व गोळा करणे, कॅम्पस अ‍ॅम्बेसीडरची कार्यशाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे रॅलीचे आयोजन तसेच कलापथक, लोकनृत्य, जिंगल्स, पोस्टर बॅनरद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे सांगितले..जिल्हास्तरावर मानवी श्रृखंलाचे आयोजन, मतदान जनजागृती रॅली, नैतीक मतदान प्रशिक्षण, चित्रकला स्पर्धा आयोजित करणे आदी उपक्रम घेण्याबाबत सुचित केले. तसेच भंडारा, तुमसर, साकोली विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी स्विप कार्यकमाचे संनियंत्रण करून जनजागृतीचा कालबध्द कार्यकम यशस्वी करावा, असे निर्देश दिले.या प्रसंगी भंडारा, साकोली, तुमसर येथील स्विप कार्यक्रमाचे जनजागृती बाबत करण्यात आलेले नियोजन जिल्हाधिकारी यांना सादर केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मतदार वाढविण्याच्या दृष्टीने विशेष चर्चा केली.स्वातंत्र्यदिनी जनजागृती१५ आॅगस्ट २०१९ पासून जनजागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी होत आहे. १५ आॅगस्टला स्वातंत्र्यदिनी होणाºया ग्रामसभेमध्ये मतदान यादींचे वाचन, मतदान यादी शुध्दीकरण, मतदान यादींमध्ये फोटो अपडेट करणे, मतदान यादीत नाव तपासून घेणे, दुबार, मयत, स्थानांतरीत करणे, मतदान प्रक्रियेता बोगस मतदान होणार नाही याबाबत सर्तकता राखणे, निर्भयपणे मदान करणे, मतदान प्रक्रियेत कोणत्याही प्रलोभनास बळी न पडणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी