शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत उपाध्यक्षपदी रायपूरकर यांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 00:16 IST

नगर परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवकांचे प्रथम सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली.

न.प.निवडणूक : स्वीकृत सदस्यपदी विलास काटेखाये, बिसने यांची निवडपवनी : नगर परिषद नवनिर्वाचित अध्यक्ष व नगरसेवकांचे प्रथम सभेत उपाध्यक्ष व दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी काँग्रेसचे कमलाकर रायपूरकर यांची एकमताने निवड करण्यात आली.दोन स्वीकृत सदस्य निवडीसाठी पाच जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी नगर विकास आघाडीचे अध्यक्ष विलास काटेखाये, काँग्रेसचे राकेश बिसने, मनोहर उरकुडकर, अवनती राऊत व मच्छिंद्र हटवार यांचेपैकी नियमातील तरतुदीनुसार नगरविकास आघाडीच्या गटनेत्याने विलास काटेखाये व काँग्रेसच्या गटनेत्याने राकेश बिसने यांचे नाव सुचविल्याने त्यांची स्विकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष पुनम काटेखाये यांनी काम पाहिले.उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसचे कमलाकर रायपूरकर व राष्ट्रवादीच्या शोभना गौरशेट्टीवार यांनी अर्ज दाखल केले होते. शोभना गौरशेट्टीवार यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे काँग्रेसचे कमलाकर रायपूरकर यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. उपाध्यक्ष व स्विकृत सदस्यांच्या निवडीवरुन शहर काँग्रेसमधील एक गट नाराज झाला होता. त्यांनी मिरवणुकीत सहभाग घेतला नाही. (तालुका प्रतिनिधी)