शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मैत्रय बौद्ध विहार येथे वर्षावास समाप्ती कार्यक्रम

By admin | Updated: October 28, 2016 00:32 IST

नाशिक नगर येथील मैत्रेय बौद्ध विहारात १६ आॅक्टोबर रोजी श्रामनेरी सुमेधा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मान्यवरांचे मार्गदर्शन : आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजनभंडारा : नाशिक नगर येथील मैत्रेय बौद्ध विहारात १६ आॅक्टोबर रोजी श्रामनेरी सुमेधा यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरूवात बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर बाल संस्कार शिबिराच्या मुलांनी बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा, मार्ग दावी आम्हा प्रसंग हे स्वागत गीत गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी भिक्खुनी सुमेधा यांनी भगवान बुद्धने धम्मचक्र प्रवर्तन वेळी आपल्या पंचवर्णीय भिक्खूंना काय सांगितले यावर त्यांनी सखोल माहिती सांगितली. त्यांनी असे सांगितले की, धम्मचक्र प्रवर्तनाच्या वेळी तथागतांनी भिक्खुंना सांगितले की, दोन अतिथींको टालो, एक म्हणजे काया, क्लेषाचा मार्ग, दुसरा भोग विलासाचे मार्ग, या दोन्ही गोष्टी टाळून मध्यम मार्गाचा अवलंब करा. धम्ममार्गावर जीवन जगण्यासाठी त्यांनी पाच मापदंड दिले आहेत. एक जो पंचशील युक्ती जीवन जगतो, तो स्वत:ला शुद्ध करतो. तिसरे आर्यअष्टांगीक मार्ग म्हणजे अविद्या नष्ट करणे, म्हणजे चार आर्यसत्व अंगीकार करणे व पाचवी दहा पामिता तंतोतंत पाळणे. यामुळे भिक्खु, भिक्खुनी, उपासक, उपासिका यांना वर्षावासाला काळ हा चारित्रीक बळ प्राप्त करण्याचा काळ आहे. या काळात चित्तांची वाईट सवय सोडायची असते.प्रत्येकाने उपोसथ व्रत धारण करून स्वत:च्या काया, वाचा, मनाची शुद्धी करावयाची असते असे त्यांनी सांगितले. त्यानंतर स्मृतिशेष विलास बनकर यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ डॉ. सागर गणवीर यांचे एक दिवसीय शिबिर घेण्यात आले. यानंतर बाल संस्कार शिबिराच्या लहान मुलांनी विशाखाचे औदार्य यावर एक नाटीका सादर केली. अ‍ॅड. विनय मोहन पशिने यांनी वर्षावास समारोपीय कार्यक्रमप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या.त्यानंतर वर्षावास कालावधीसंबंधी निशा डोंगरे, शारदा देशभ्रतार, संजीवनी आंभोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संचालन प्रतिभा मेश्राम व इंदू गणवीर यांनी प्रास्ताविक सुशिला शहारे तर आभार अरुणा शहारे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंदू गणवीर, सुशिला शहारे, अंजिरा नागदेवे, ज्योती सतदेवे, लिला वासनिक, शारदा देशभ्रतार, निमिमा पाटील, माया बागडे, जितू मेश्राम, प्रफुल्ल, कोटांगले, प्रफुल्ल देशभ्रतार, प्रशांत देशभ्रतार, पिंटू अंबादे, भुपेश शेंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)