शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

९० दिवसात बरसला ८४ टक्के पाऊस

By admin | Updated: August 31, 2015 00:28 IST

मागील वर्षीच्या ७३२ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८७४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सरासरी ८७४ मिमी पाऊस : वार्षिक सरासरी गाठणे अशक्य, ४५६ मिमी पावसाची गरजदेवानंद नंदेश्वर  भंडारामागील वर्षीच्या ७३२ मिमी पावसाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ८७४.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ३० आॅगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पावसाच्या तुलनेत हा पाऊस ८४ टक्के आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या शिल्लक राहिलेल्या अवघ्या दोन महिन्यात ४५६ मिमी पाऊस पडणे जवळजवळ अशक्यच आहे. अशा परिस्थिती यावर्षीच्या खरीप पिकांसोबतच आगामी रबीच्या पिकांनाही फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यात रोवणी ८६ टक्के आटोपली आहे. त्यामुळे रोवलेल्या धानपिकाच्या कोवळ्या रोपांना पाण्याची गरज असल्याने शेतकरी आभाळाकडे नजरा लावून पावसाची आतुरतेने वाट पाहात आहेत. वार्षिक सरासरीच्या अंदाजानुसार ३० आॅगस्टपर्यत जिल्ह्यात १,०३८.५ मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र आतापर्यंत ८७४.७ मिमी पाऊस पडला आहे.सर्वसाधारणपणे पावसाच्या पाच महिन्यात, म्हणजे १ जून ते ३० आॅक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी १,३३०.२ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असते. मात्र पावसाळ्याचे आता केवळ दोन महिने शिल्लक असताना ८५९.५ मिमी पाऊस पडल्याने अपेक्षेएवढा पाऊस होण्याची चिन्हे दिसून येत नाही. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यांना आर्थिक नुकसान सहन करण्याचे संकट शकते.पावसाच्या पाच महिन्यातील तालुकानिहाय प्रमाण पाहता भंडारा तालुक्यात आॅक्टोेंंबर अखेरपर्यंत १,२६०.८ मिमी पाऊस पडण्याची अपेक्षा असताना आतापर्यंत केवळ ८९६.७ मिमी पाऊस पडला आहे. मोहाडी तालुक्यात १,२६०.८ मिमी पावसाची अपेक्षा असताना ९२७.९ मिमी, तुमसर तालुक्यात १,२६०.८ मिमीऐवजी आतापर्यंत ७९३.३ मिमी पाऊस झाला. पवनी तालुक्यात १,२२७.४ मिमीऐवजी आतापर्यंत केवळ ८२७ मिमी पाऊस पडला आहे. साकोली तालुक्यात १,३९९.१ मिमीच्या तुलनेत केवळ ८९७.९ मिमी, लाखांदूर तालुक्यात १,४५१.३ मिमीच्या तुलनेत ८५०.४ मिमी व लाखनी तालुक्यात १,४५१.३ मिमी पडतो. मात्र आतापर्यत ८१ टक्के म्हणजे ९२९.५ मिमी पाऊस झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी संभ्रमावस्था आहे.लाखांदुरात सर्वात कमी पाऊसजिल्ह्यातील तालुकानिहाय वार्षिक सरासरी पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीवर एक नजर टाकल्यास लाखांदूर तालुक्यात सर्वात कमी ७४ टक्के तर भंडारा व मोहाडी तालुक्यात सर्वाधिक ९४ टक्के पाऊस झाला. यासह तुमसरमध्ये ८० टक्के, पवनीत ८९, साकोली ८३, लाखनीत ८४ टक्के पाऊस पडला आहे.आला पोळा, पाऊस झाला भोळाआॅक्टोबर अखेरपर्यंत पावसाची नोंद घेतली जात असली तरी पोळ्यानंतर पाऊस येण्याची शक्यता कमीच असते. 'पोळा आणि पाऊस झाला भोळा' असे म्हटले जाते. येत्या १३ दिवसांवर आलेल्या पोळ्यापर्यंत असा किती पाऊस पडणार याची काळजी सर्वांना लागली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी पाऊस वगळता अनेक ठिकाणी अनेक दिवसात पावसाने हजेरी लावलेली नाही. उलट चक्क ऊन पडत आहे. त्यामुळे कोवळी पिकं पाण्याअभावी माना टाकत आहेत.