शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरविली, धानशेती धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:15 IST

गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देयंदाही दुष्काळच सांगाती : शेतातील भेगांनी बळीराजाचे काळीज फाटले

लोकमत न्यूज नेटवर्कविरली (बु.) : गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याने या परिसरातील धानशेतांना भेगा पडल्या असून धानपीक धोक्यात आली आहे. परिणामी मागील तीन-चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा यंदाही दुष्काळच सांगाती असल्याची चिन्हे दिसत आहेत.यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीलपासूनच पावसाने वेळोवेळी समाधानकारक हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला. आर्द्रा व पुनर्वसू नक्षत्रातील पावसाने जुलै महिन्यात शेतकऱ्यांचे रोवणे आटोपले. भरघोस उत्पन्नाच्या आशेने शेतकऱ्यांनी आपल्या धानरोवणीला रासायनिक खते व औषधांची मात्रा दिली. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून पावसाने कायमच दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे धानशेतीला भेगा पडल्या असून धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. या परिसरात सद्यस्थितीत दमदार पावसाची गरज असून येत्या पाच दिवसात पाऊस न झाल्यास धान उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. सद्यस्थितीत या परिसरावर दुष्काळाची छाया पसरली आहे.या परिसरातून गोसीखुर्द प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या अनेक वितरिका वाहात आहेत. मात्र, या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात आलेले नाही. परिणामी या वितरिकांमधील पाण्यासाठी शेतकºयांमध्ये भांडणे होऊ लागली आहेत. दरम्यान शेतकरीवर्ग रात्री बेरात्री आटापीटा करून परिसरातील नाल्यांवर आणि वितरिकांवर मोटारपंप इंजिन लावून आपल्या धानशेतीची तहाण भागविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, डाव्या कालव्याच्या या वितरिकांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.भारनियमणाने वाढविली डोकेदुखीसध्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत १६ तासांचे भारनियमन सुरू असून शेतीला केवळ आठ तास विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारपंपधारक शेतकरी आहेत. मात्र, विहिरींची पाण्याची पातळी अद्याप वाढली नसल्याने या विहिरींमधून पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होणे अशक्य आहे. त्यातच विद्युत वितरण कंपनी रात्री ९ ते १२ च्या दरम्यान शेतीसाठी विद्युत पुरवठा सुरू करीत असल्याने शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतावर ये-जा करावी लागते. या धावपळीत साप, विंचू आणि अन्य सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या जिवीतास धोका पोहचू शकतो. त्यामुळे विद्युत वितरण कंपनीने सायंकाळी ६ ते ७ च्या दरम्यान शेतीसाठी विज पुरवठा सुरू करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.