शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलिसांनी पकडली १४.७४ लाखांची रोकड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST

गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात ...

गोंदिया : गोंदिया रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-१ वर जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये १४ लाख ७४ हजार ३०० रुपये घेऊन चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाला रेल्वे पोलिसांनी सोमवारी (दि. २४) दुपारी अटक केली. संजू मंगल बेहरा (वय ३५, रा. तरुणनगर, कालीमाता वाॅर्ड क्रमांक-३० पंडितराई रायपूर, छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गोंदिया रेल्वे पोलिसांकडून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी फलाटावर नियमित तपासणी करीत असताना त्यांना संजू बेहरा संशयास्पद स्थितीत साहित्य घेऊन जाताना आढळला. फलाट क्रमांक-१ वर उभ्या असलेल्या रायपूरकडे जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तो चढण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे यांनी त्याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याजवळ २०००, ५००, २०० व १०० रुपयांच्या भरपूर नोटा आढळल्या. त्या नोटांची मोजणी केली असता १४ लाख ७४ हजार ३०० रुपये रोकड असल्याचे स्पष्ट झाले.

ही कारवाई रेल्वे पोलीस ठाण्याच्या ठाणेदार अनिता खेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, पोलीस हवालदार अरुण गोंधळे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सेलुटे, नंदकिशोर नारनवरे यांनी केली. या रकमेची माहिती आयकर विभागाला देण्यात आली आहे.? रेल्वे पोलिसांनी जप्त केलेला हा पैसा कशाचा आणि कुठून कुठे जात होता याची चौकशी सुरू आहे.?