शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

अपघातातील मृतकाची माहिती देण्यास रेल्वे विभागाची टाळाटाळ

By admin | Updated: May 2, 2015 00:44 IST

स्पर्धा परीक्षा आटोपून गावाकडे परतणाऱ्या तरूणाचा रेल्वे गाडीतून खाली पडून अपघाती मृत्यू झाला.

पालकांचा आरोप, आत्मदहनाचा इशारा भंडारा : स्पर्धा परीक्षा आटोपून गावाकडे परतणाऱ्या तरूणाचा रेल्वे गाडीतून खाली पडून अपघाती मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती देण्यास रेल्वे विभाग टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत, न्याय न मिळाल्यास नागपूर रेल्वे स्टेशनसमोर आपले आयुष्य संपविण्याचा इशारा मृत तरूणाच्या आई-वडिलांनी दिला आहे. लाला लजपतरॉय वॉर्ड, भंडारा येथील शुभम देवानंद पिल्लेवान (१९) हा तरूण गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात स्टॉप सिलेक्शन कमिशनची लेखी परीक्षा देण्यासाठी कोल्हापूर येथे गेला होता. ९ नोव्हेंबर २०१४ रोजी तत्काळ तिकीट घेवून कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्रने भंडाराकडे येण्यास निघाला. तथापि, तिकीट कनफर्म झाली नाही. परिणामी आरक्षित डब्यात बसून त्याने पुढचा प्रवास सुरू केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी १० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एक्सप्रेस नागपूर येथे पोहचत असताना धंतोली भागात डब्यातून पडून त्याचा मृत्यू झाला. शुभमच्या आई-वडिलानी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास पाच तासापर्यंत शुभमचा मृतदेह रेल्वे रूळावर पडून होता आणि या अवघीत अनेक गाड्या त्या शरीरावरून गेल्याने मृतदेहाच्या चिंधळ्या झाल्या. रेल्वे प्रशासनाने अनेक तास पर्यंत घटनेची दखल घेतली नाही. शुभमने केलेल्या प्रवासाची माहिती मिळू नये, तो विना तिकीट प्रवास करीत होता, असे भासविण्यासाठी त्याच्या पॅन्टच्या खिशातून पर्स काढून घेण्यात आल्याचा आरोपही आई-वडिलांनी केला आहे. रेल्वे डब्यातून पडून शुभमच्या मृत्यूसंदर्भात माहितीच्या अधिकाराखाली पिल्लेवान दाम्पत्याने रेल्वे प्रशासनाकडे आधी २७ जानेवारी व नंतर ११ मार्च रोजी माहिती मागितली. परंतु अद्यापर्यंत माहिती पुरविण्यात आली आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस आणि प्रशासनावर योग्य कारवाई करून शुभमला न्याय देण्याची मागणी पिल्लेवान कुटूंबियांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास नागपूर रेल्वे स्थानकासमोर स्वत:चे जीवन संपविण्याचा इशारा वडिल देवानंद, आई सुषमा आणि बहिण प्रांजली पिल्लेवान आदींनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)