लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : दिल्ली येथील रेल्वे बोर्ड सदस्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत तुमसररोड रेल्वे स्थानकाला भेट देवून निरीक्षण केले. स्थानिक पदाधिकाºयांनी यावेळी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या मांडल्या. रेल्वे बोर्ड सदस्यांनी रेल्वेच्या अधिकाºयांना याप्रसंगी निर्देश दिले.रेल्वे बोर्डाचे सदस्य पुनमचंद्र त्रिपाठी, मनिषा चटर्जी तथा रेल्वेचे वरिष्ठ अधिकाºयांनी गुरुवारी तुमसर रोड रेल्वेस्थानकाला आकस्मिक भेट देऊन संपूर्ण रेल्वेस्थानकाची पाहणी केली. तथा अधिकाºयांशी चर्चा केली. स्थानिक रेल्वे समिती सदस्य एम. डी. आलमखान, सुशिल बन्सोड, जि.प. सदस्य के. के. पंचबुध्दे यांनी तुसमर रोड रेल्वे स्थानकावरील फुटवे ब्रीजचे निर्माण करण्याची मागणी केली. रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर प्रवाशी गाड्या घेण्यात याव्यात, रेल्वे जागेतील सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली.स्थानिक रेल्वे अधिकाºयांशी रेल्वे बोर्ड सदस्य त्रिपाठी यांनी अनेक समस्यांवर चर्चा केली. समस्या दूर करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाºयांना दिले. रेल्वे हायटेक होत असून त्या दृष्टीने काय करता येईल. त्याकरिता देशातील जंक्शन रेल्वेस्थानकांची माहिती रेल्वे प्रशासन जमा करत असल्याचे चर्चेच्यावेळी जाणवले. दिल्ली येथून रेल्वे बोर्डाचे सदस्य का आले याचे कुतूहल अधिकारी व स्थानिक पदाधिकाºयांना झाले होते.याप्रसंगी स्टेशन मास्टर राजेश गिरी, विभागीय रेल्वे अभिय२ंता महेंद्र सिंग, ब्रजेश पांडे, एएससी ऐके स्वामी, सुरक्षा दल प्रमुख माणिकचंद, एम.पी. राऊत, प्रदीप मिश्रा, राहांगडालेसह स्थानिक रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बोर्ड सदस्यांतर्फे रेल्वेस्थानकाचे निरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 21:34 IST
दिल्ली येथील रेल्वे बोर्ड सदस्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांसोबत तुमसररोड रेल्वे स्थानकाला भेट देवून निरीक्षण केले.
बोर्ड सदस्यांतर्फे रेल्वेस्थानकाचे निरीक्षण
ठळक मुद्देपदाधिकाºयांनी मांडल्या समस्या : वरिष्ठ अधिकाºयांना दिले निर्देश