शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

कर्णकर्कश हॉर्न लावणारे वाहतूक पोलिसांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हार्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे. मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न उपलब्ध आहेत. बरेच जण चारचाकी किंवा मोठ्या ट्रकचा हॉर्न दुचाकीला लावतात. विशेष करून अल्पवयीन मुले व युवा वर्गांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

ठळक मुद्देध्वनी प्रदूषणासह रस्त्यावर चालणाऱ्यांमध्ये दहशत

देवानंद नंदेश्वरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरासह जिल्ह्यात धूमस्टाईल दुचाकी पळविणाऱ्यांचा उपद्रव वाढला आहे. हे टोळके कर्णकर्कश हॉर्न वाजवून वर्दळीच्या रस्त्यावर दहशत पसरविण्याचा प्रयत्न करतात. यातून ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. काहींना वाहन चालविताना सतत हॉर्न वाजविण्याची सवय जडलेली असते. त्यामुळेही इतरांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा वाहनधारकांकडून वाहतूक पोलिसांनी २८ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. फटाके फोडणाऱ्या दुचाकींवर मात्र कारवाई झालेली नाही.मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहनांच्या हार्नची तीव्रता कमी डेसिबल असावी, हे ठरलेले आहे. मात्र, मार्केटमध्ये अतिशय कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न उपलब्ध आहेत. बरेच जण चारचाकी किंवा मोठ्या ट्रकचा हॉर्न दुचाकीला लावतात. विशेष करून अल्पवयीन मुले व युवा वर्गांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात आपल्या वाहनांचे हॉर्न वाजवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे महाविद्यालय परिसर सायलेन्स झोन असूनही तेथे नियमांची सातत्याने पायमल्ली केली जात आहे. यावर कारवाईची प्रतीक्षा आहे. पाेलीसही आता सज्ज झाले आहे.

फटाके फोडणारे दुचाकीस्वार मोकाटच  काही विशिष्ट प्रकारच्या दुचाकींवर फटाके फोडणारे सायलेन्सर लावले जाते. यातून ठिणग्याही बाहेर पडतात. अशा दुचाकी अगदी दाटीवाटीने व वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात फिरवून दुचाकीस्वारांकडून फटाके फोडले जातात. अचानक जवळ येऊन प्रचंड आवाज आल्यानेही  वाहनचालक घाबरून अपघात होण्याची भीती आहे. अनेक जण या फटाक्यांचा आवाज ऐकून कोसळले आहेत. मात्र, फटाके फोडणारे दुचाकीस्वार पोलीस कारवाईपासून दूर आहेत. अनेक तरुणांमध्ये माेटारसायकल वेगाने चालविण्याची क्रेझ अलीकडे पहावयास मिळत आहे. यामुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंगणीक वाढ हाेत आहे.

वर्षभरात १४१ जणांवर पोलिसांचा दंडुका  वाहतूक पोलिसांनी भंडारा शहरासह जिल्ह्यात कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्या १४१ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून २८ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला. काही ठिकाणी पोलिसांनी असे हॉर्न काढून घेतले. पोलीस कारवाई झाल्याने काही काळ अशा वाहनचालकांकडून हॉर्नचा वापर केला जात नाही. मात्र नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यातील दंडाची रक्कम वाढविण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी