शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांचा जिल्हा परिषदेत राडा

By admin | Updated: January 13, 2017 00:13 IST

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र हटविल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सीईओंच्या कक्षात राडा केला.

साहित्यांची तोडफोड : अधिकारी, पोलीस व शिवसैनिकांच्या बैठकीनंतर वातावरण निवळलेभंडारा : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र हटविल्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी सीईओंच्या कक्षात राडा केला. त्यापूर्वी अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन धुडगुस घातला. त्यानंतर शिवरायांची तसबीर लावल्यानंतर वातावरण निवळले.जिल्हा परिषदेत चार महिन्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून शरद अहीरे हे रूजू झाले. या कक्षातील भिंतीवर सुरूवातीपासून शिवरायांचे छायाचित्र होते. नवीन वर्षाच्या प्रारंभी हे छायाचित्र तिथून हटविण्यात आले. ही बाब गुरूवारला दुपारी पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आताचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा कृषी सभापती नरेश डहारे आणि शिवसेनेचे पदाधिकारी यशवंत सोनकुसरे यांना माहित झाली. त्यानंतर त्यांनी आज गुरूवारला सीईओंच्या कक्षात प्रत्यक्ष भेट देऊन हा प्रकार पाहिला असता त्यांना शिवरायांचे छायाचित्र दिसले नाही. यावर मंथन सुरू असतानाच ही बाब शिवसैनिकांना माहित झाली. त्यानंतर शेकडोच्या संख्येने शिवसैनिक जिल्हा परिषदेत आले आणि तोडफोड सुरू केली. या प्रकाराला जबाबदार धरून शिवसैनिकांनी आपला मोर्चा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) सुधीर वाळके यांच्या कक्षाकडे वळविला. वाळके हे अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्या कक्षात असल्याचे कळताच शिवसैनिकांनी त्या कक्षाकाडे कुच केली. तिथे वाळके दिसताच शिवसैनिकांनी त्याच कक्षातील टेबल-खुर्च्यांची तोडफोड केली. लोखंडी कपाटाच्या काचा फोडल्या. स्वीय सहायकांच्या टेबलवरचा टेलिफोन आपटून फोडून टाकला. याशिवाय जिल्हा परिषदेतील कचरा पेट्या फेकल्यामुळे कचरा अस्ताव्यस्त झाला. भिंतीवर टांगलेली टपालपेटी फोडून टाकली. या आंदोलनात शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे, जिल्हा उपप्रमुख अनिल गायधने, संजय रेहपाडे, शहर उपप्रमुख यशवंत सोनकुसरे, मुकेश थोटे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. त्यानंतर पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर, पोलीस निरीक्षक जयवंत चव्हान, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सुधीर वाळके व नरेंद्र भोंडेकर यांच्यासह आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक झाली. त्यापूर्वी शिवाजी महाराजांचे नवीन छायाचित्र कक्षात लावण्यात आले. या बैठकीत पोलीस तक्रार करणार नसल्याची माहिती सूत्राने दिली. (जिल्हा प्रतिनिधी)