शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आमगाव व सालेकसा तालुक्यात रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:35 IST

आमगाव : तालुक्यातील बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेव्दारे चैतन्य शेती साधन व कृषी बहुद्देशीय सहकारी संस्था टेकरी (कालीमाटी) अंतर्गत ...

आमगाव : तालुक्यातील बहुद्देशीय औद्योगिक सहकारी संस्थेव्दारे चैतन्य शेती साधन व कृषी बहुद्देशीय सहकारी संस्था टेकरी (कालीमाटी) अंतर्गत कटरे राइस मिल कालीमाटी व वीरांगना राणी अवंतीबाई शेतकरी बहुद्देशीय सहकारी संस्था निंबा अंतर्गत मच्छिरके राइस मिल कावराबांध या खरेदी केंद्रात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते व मार्केटिंग फेडरेशनचे महाव्यवस्थापक अतुल नेरकर यांच्या उपस्थितीत धान खरेदीला प्रारंभ करण्यात आला.

रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्यासंदर्भात मंगळवारी (दि.१८) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसह मुंबई येथे चर्चा केली होती. या बैठकीत या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी ३ दिवसात धान खरेदी सुरू करण्याचे आश्वासन खा. पटेल यांना दिले होते. त्यानुसार गुरुवारपासून (दि.२०) धान खरेदीला प्रारंभ झाल्याने त्याची पूर्तता झाली आहे. जसजसे गुदामे उपलब्ध होतील तसतसे धान खरेदी केंद्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

दरम्यान, रब्बी हंगामातील धान खरेदीला सुरुवात झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यावेळी विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, कमलबापू बहेकार, सुखराम फुंडे, सुरेश हर्षे, बिसने, गोंडाणे, बाबूलाल बोपचे, टिकाराम मेंढे, भृगलास्तव, आशिष भुतडा, अजय भुतडा, अजय कोठारी, सुभाष यावलकर, नामदेव दोनोडे, नामदेव पागोटे, तुकडोजी रहांगडाले, लक्ष्मण नागपुरे, अजय बिसेन, संतोष रहांगडाले, श्रीखंडे, वंजारी, वासुदेव डोये, बाबुलाल दोनोडे, डोमेश्वर सोनवाने, प्रदीप रावत, संजय रावत, रमेश भुते, धनराज गिऱ्हेपुंजे, बापू भांडारकर, सयसराम मेहर, संजय हरिणखेडे, पवन चुटे, गोरेलाल पटले, मोतीलाल कटरे, डिलेश्वर सोनवाणे, तुलशीराम बिसेन, सतीश कटरे, संचालक मंडळ व बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. उपस्थितांनी खा. पटेल व माजी आ. जैन यांचे आभार मानले.