शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

वाहतुकीचा प्रश्न बनला जटील

By admin | Updated: February 19, 2015 00:36 IST

मुरमाडी येथील तीन मुलींच्या प्रकरणामुळे लाखनी पोलीस ठाण्याचे नाव राज्यभरात गाजले होते. राज्याचे गृहमंत्री ते पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत सर्वांनी या पोलीस ठाण्यामध्ये ...

चंदन मोटघरे लाखनीमुरमाडी येथील तीन मुलींच्या प्रकरणामुळे लाखनी पोलीस ठाण्याचे नाव राज्यभरात गाजले होते. राज्याचे गृहमंत्री ते पोलीस महासंचालक यांच्यापर्यंत सर्वांनी या पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावली. राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस ठाणे म्हणून लाखनी पोलीस ठाणे महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. मागील दोन वर्षात लाखनी परिसरातील गुन्ह्याचा आलेख घसरला असला तरी अवैध वाहतुकीची समस्या अधिक आहे. कर्मचाऱ्यांची वानवा लाखनी पोलिस ठाण्यामध्ये ३ अधिकारी व ५६ कर्मचारी कार्यरत आहेत. ६ अधिकाऱ्यांची गरज आह ेव ५ पोलिसांची संख्या कमी आहे. काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. लाखनी पोलीस स्टेशनमधील ९३ हजार लोकसंख्या सांभाळण्यास कर्मचाऱ्यांची उणीव भासते. भौगोलिक स्वरूप पूर्व ते पश्चिम २५ कि़मी. व उत्तर दक्षिण ३९ कि.मी. चे क्षेत्र आहे. राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अपघाताच्या घटना घडत असतात. त्यामुळे पोलिसांची कुमक अशा घटनामध्ये वापरावी लागते. पोलीस उपनिरीक्षकांची ३ पदे रिक्त आहेत. लाखनी परिसरात अशोक लेलँड, एमआयडीसी राजेगाव, पोहरा माईन्स, हिंदुस्थान कंपोझिट, भेल अशी औद्योगिक क्षेत्र येत असतात. यामुळे सुरक्षेची जबाबदारी लाखनी पोलीस स्टेशनची असते. ६१ गावांना सांभाळताना अडचणी लाखनी पोलीस स्टेशनची निर्मिती १४ फेब्रुवारी १९७० ला झाली. साकोली स्टेशनपासून लाखनी वेगळी झाली. पूर्वी लाखनी येथे पोलीस चौकी होती. १९८३ मध्ये लाखनी पोलीस स्टेशनचे नवीन इमारतीत स्थानांतरण झाले होते. लाखनी पोलीस स्टेशनमध्ये ६१ गावे येतात. टोकावरच्या गावात पोहचायला अर्धातासापेक्षा जास्त कालावधी लागतो. लाखनी पोलीस स्टेशनमधील लाखनी, मुरमाडी, सावरी, पोहरा, गुंथारा, पिंपळगाव (सडक) हे गाव संवेदनशील आहेत. केसलवाडा पवार येथे पोलीस चौकीच प्रश्न प्रलंबित आहे. लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ६१ गावांना सांभाळताना पोलिसांची दमछाक होत असते. लाखनी पोलीस स्टेशनची इमारत अपुरी आहे. पोलिसांसाठी विसावा हे विश्रामगृह आहे त्याचा उपयोग कार्यालयासारखा होतो. घरफोडीवर नियंत्रणासाठी लोकांचा सहभाग उन्हाळ्यात घरफोडीचे अनेक प्रसंग घडतात. घर सोडून जातांनी कुलूप लावल्यानंतर पोलिस स्टेशनला माहिती देणे आवश्यक असते. कुलरच्या आवाजामुळे शेजारच्या घरी चोरी झाली हे लक्षात येत नाही. मोहल्यात व गल्लीत कोणताही अनोळखी व्यक्ती दिसला तर त्याची चौकशी करणे आवश्यक असते, असे जयवंत चव्हाण यांनी सांगितले.नक्षलग्रस्त प्रभागलाखनी पोलीस स्टेशनमधील खुर्शिपार, उसगाव, चिखलाबोडी, सोनेखारी ही गाव नक्षलप्रभाव क्षेत्र संवेदनशिल गाव आहेत. लाखनी पोलीस स्टेशनच्या परिसरात नक्षलविरोधी पथक आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली यांच्या अधिपत्याखाली १८ व्यक्तींचे कमांडो पथक आहे. आवश्यकतेनुसार लाखनी, साकोली, लाखांदूर तालुक्यातील कोणत्याही घटनेनुसार नक्षलविरोधी पथकाची मदत घेतली जाते. लाखनी पोलिस स्टेशनचा बराच परिसर जंगलव्याप्त आहे.पोलीस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम महात्मा गांधी तंटामुक्त अभियान संपूर्ण ४७ ग्रामपंचायतमध्ये लाखनी पोलीस स्टेशनने राबवून ठाण्यातील १०० टक्के गावे तंटामुक्त केली आहेत. तंटामुक्त समितीच्या वर्षातून दोनदा कर्यशाळा आयोजित केल्या जातात. गावातील तंटे गावातच मिटले पाहिजे, असा आग्रह धरला जातो. दारूबंदीचे ७५ टक्के उद्दिष्ट सफल झाले आहे. महिला मंडळाच्या निवेदनानुसार गावात दारूबंदी केली जाते. अवैध दारूविक्रीवर पुर्णपणे निर्बंध घातले आहे. पोलीस स्टेशनमध्ये रेझिंग डे साजरा केला जातो. बचतगटांच्या महिलांचे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. दारूबंदी गावात दारूड्यावर ८५ अ कलमान्वये कारवाई केली जात आहे. विना नंबर प्लेटच्या वाहनावर कारवाई केल्या जात आहे. २०७ वाहनावर कारवाई केली आहे. यामुळे गाडी चोरी जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येक शाळेला भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यामधील व्यसनाधिनता कमी करता यावी यासाठी प्रयत्नशिल आहेत.सदनिका भग्नावस्थेतलाखनी पोलीस स्टेशनसमोर पोलिसांसाठी ५ सदनिका व ठाणेदारांचा बंगला १९८७ मध्ये तयार करण्यात आला होता. निकृष्ट प्रतीच्या बांधकामामुळे सदनिका भग्नावस्थेत आहेत. केवळ दोन कुटूंब सदनिकेमध्ये राहतात. यावर्षी एका सदनिकेची दुरूस्ती करण्यात आली परंतु ना त्या व्यवस्था केलेली नाही. थातुरमातूर दुरूस्ती केल्यामुळे सदनिकेत कोणीही राहायला तयार नाही. कर्मचारी भाड्याच्या घरात राहतात यामुळे पोलिसांना आवश्यकतेनुसार बोलविण्यास अडचणी येतात. सदनिकापुर्णपणे पाहून नवीन सदनिका तयार करणे आवश्यक आहे. परिसरात घान व कचरा साचलेला असल्याने पोलीस स्टेशनच्या सदनिकेत कोणीही जायला तयार नाही.पार्किंगची समस्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण केल्यानंतर लोकांनी १०० फुटापर्यंत रस्ता मोकळा करून दिला नाही. यामुळे सर्व्हिस रोडवर वाहने ठेवली जातात. लोकांनी पोलिसांना सहकार्य करून पार्किंगची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. शालेय विद्यार्थी व पादचारी सर्व्हिस रोडचा वापर करतात रोडवर ट्रक उभी ठेवली जातात. यामुळे अडचणी येतात, अपघाताच्या घटना घडतात.नियंत्रणावर भर हवा लाखनी पोलीस स्टेशनमध्ये २०१३ मध्ये १७३ गुन्हे प्रकरणाची नोंद होती. २०१४ मध्ये हे प्रमाण १३४ पर्यंत कमी करण्यात आले आहे. चोरी, घरफोडीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. जबरी चोरीच्या घटनांना लगाम घालण्यात आला आहे. रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी झाले आहे. ३ वाहतुक पोलीस आहेत त्यांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. एटीएम असलेल्या बँकाना चोवीस तास सुरक्षा रक्षक ठेवण्याचे आदेश दिले आहे. राष्ट्रीय महामार्गावर मुरमाडी गावात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न आहे. यावरून गुन्हेगारीवर लक्ष ठेवता येईल. बँकांना आतमध्ये नाही तर गेटवर सुद्धा कॅमेरा लावण्यास सांगितले आहे. आतमध्ये येणारा व्यक्ती लक्षात येवू शकेल.फिटनेसला प्राधान्यपोलिसांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. पोलीस फिटनेससाठी दर शुक्रवारी परेड घेतली जाते. परिसरात व्हॉलीबॉलचे मैदान आहे. येथे पोलीस व कमांडोपथक व्हॉलीबॉल खेळतात. पोलिसासाठी योग व प्राणायमनाचे वर्ग आयोजित केले जाणार असल्याचे जयवंत चव्हान यांनी सांगितले.