शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार

By admin | Updated: May 9, 2016 00:27 IST

गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असूनही तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून प्रलंबित होता.

खापरी येथे सभा : उपजिल्हाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांना आश्वासनपवनी : गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असूनही तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेला कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. गावठाणासाठी पुरेशी जमीन उपलब्ध होत नसल्याने स्वेच्छा पुनर्वसनाचा मुद्दा समोर आलेला होता. ग्रामसभेत ७० टक्के ग्रामस्थांनी स्वेच्छा पुनर्वसनाची तयारी दाखविल्यामुळे जिल्हा प्रशासन व पुनर्वसन विभागाने संयुक्त सभा आयोजित करुन स्वेच्छा पुनर्वसन पाहिजे असल्यास तीन महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, असे आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले आहे.खापरी (रेहपाडे) गाव गोसेखुर्द धरण व उमरेड - कऱ्हांडला-पवनी अभयारण्यामुळे प्रभावित झालेला आहे. गावाचे एका बाजुला धरणामध्ये साठविलेले पाणी व दुसरी बाजूला अभयारण्याचे जंगल व त्यातील हिंस्त्र प्राण्यापासून उद्भवणारा त्रासामुळे ग्रामस्थ भयग्रस्त झालेले आहेत. त्यामुळे गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हावे ही त्यांची रास्त अपेक्षा आहे. गावातील बहुसंख्य लोकांनी स्वेच्छा पुनर्वसनासाठी आवेदनपत्र भरुन दिल्यामुळे खात्री करण्याच्या उद्देशाने गोसीखुर्द प्रकल्पाच्या पुनर्वसन विभागाने गावात शनिवारला सभेचे आयोजन केले होते. सभेला उपस्थित उपजिल्हाधिकारी विजया बनकर, कार्यकारी अभियंता काळे, तहसिलदार एस. के.वासनिक, गट विकास अधिकारी बी. वाय. निमसरकार व सरपंच रेहपाडे उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी विजया बनकर यांनी ग्रामस्थांकडून गावठाण की स्वेच्छा पुनर्वसन ते जाणून घेतले. बहुसंख्य लोकांनी स्वेच्छा पुनर्वसनास होकार दिल्याने येत्या तीन महिन्यात पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागु शकतो. तसेच ज्यांना भुखंड पाहिजे आहे त्यांना उपलब्ध गावठाणामध्येच भुखंड उपलब्ध करुन देण्यात येईल असे आश्वस्थ केले. संपूर्ण गावास गावठाण पाहिजे असल्यास पुन्हा पाचवर्षे पुनर्वसनासाठी लागु शकतात अशी शक्यता त्यांनी बोलून दाखविली. (तालुका प्रतिनिधी)