शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस चौकीचा प्रश्न मार्गी लावणार

By admin | Updated: December 21, 2014 22:54 IST

बपेरा आंतरराज्यीय तथा अन्य सीमा कायमस्वरुपी बंदोबस्तात ठेवण्यासाठी पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात बांधकामाला गती देण्यात येणार आहे,

चुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतरराज्यीय तथा अन्य सीमा कायमस्वरुपी बंदोबस्तात ठेवण्यासाठी पोलीस चौकी निर्मितीला मंजुरी मिळाली आहे. येत्या महिनाभरात बांधकामाला गती देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक कैलास कणसे यांनी केले.भंडारा जिल्हातील पोलीस पाटील तथा तंमुसचे अध्यक्ष यांच्या संयुक्त आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, तुमसरचे पोलीस निरीक्षक गवई, सिहोऱ्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश इंगोले उपस्थित होते. कणसे म्हणाले, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, शांतता ठेवण्यासाठी आंतरराज्यीय सीमा महत्वपूर्ण आहेत. या सीमा पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. या सिमेवर पक्की इमारत बांधकाम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. बपेरा आंतरराज्यीय सीमेवर जागेची अडचण होती. ही अडचण निकाली काढण्यात आली आहे. गावात कार्य करताना पोलीस पाटलाची भूमिका महत्वाची आहे. गावात निर्माण होणारे वाद तात्काळ निकाली काढली पाहिजे. या वादाकडे दुर्लक्ष केल्याने विकोपाला जात आहेत. पोलीस पाटील तथा तंमुसच्या अध्यक्षामध्ये समन्वय असण्याची गरज आहे. समोपचाराने वाद निकाली काढण्यासाठी बैठका घेण्याची गरज आहे. यात पक्षतापूर्ण निर्णय घेवू नये. याशिवाय गावात दाखल होणाऱ्या मुसाफिरांची नोंद पोलीस पाटलांना ठेवली पाहिजे. पोलीस ठाण्यात पाटलाच्या बैठका घेवून विचारांची आदानप्रदान करण्यात यावी. गावात पोलीस पाटलांनी सदैव अलर्ट राहण्याची गरज आहे.. यावेळी पोलीस पाटील आणि तंमुसचे अध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कणसे यांनी अडचणी सांगितल्या असता निकाली काढण्याची ग्वाही दिली. (वार्ताहर)