शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गाच्या मुरूम भराव कामावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:45 IST

तुमसर व मोहाडी तालुक्यातील शिवारात राष्ट्रीय महामार्गात मुरूमाच्या भरावाकरिता महसूल प्रशासनाने पुन्हा जांब कांद्री येथील गटक्रमांक ६६९/१ येथून लीज मंजूर करण्यात आली. सदर गटात भूगर्भातून पाणी लागेपर्यंत मुरूमाचे उत्खनन करण्यात येत आहे. रस्त्यावर मुरूम भरावयाचे काम सध्या बंद असल्याची माहिती आहे. सदर कंपनीचे अधिकारी महसूल प्रशासनाचे उंबरडे झिजवत आहेत, हे विशेष.

ठळक मुद्देदंडाच्या रक्कमेत वाढीची शक्यता : जमिनीचा तळ लागेपर्यंत मुरूमाचे अवैध उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील शिवारात राष्ट्रीय महामार्गात मुरूमाच्या भरावाकरिता महसूल प्रशासनाने पुन्हा जांब कांद्री येथील गटक्रमांक ६६९/१ येथून लीज मंजूर करण्यात आली. सदर गटात भूगर्भातून पाणी लागेपर्यंत मुरूमाचे उत्खनन करण्यात येत आहे. रस्त्यावर मुरूम भरावयाचे काम सध्या बंद असल्याची माहिती आहे. सदर कंपनीचे अधिकारी महसूल प्रशासनाचे उंबरडे झिजवत आहेत, हे विशेष.मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे सध्या कामे जोमात सुरू करण्यात आले, परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम भरावात मुरूमाचे अवैध उत्खनन करून घालण्यात आले. केवळ अडीच हजार ब्रासची लीज महसूल प्रशासनाने दिली होती. प्रत्यक्षात २१ हजार ८०८ ब्रास मुरूम उत्खनन करण्यात आले. महसूल प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनीत चार कोटी ४८ लक्ष १६ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस पाठविली.जांब-कांद्री शिवारात पुन्हा गट क्रमांक ६६९/१ मध्ये महसूल प्रशासनाने मुरूम उत्खननाची लीजला मंजुरी प्रदान केली. येथेही नियमबाह्यपणे मुरूम उत्खनन करण्यात आले. जमिनीचा तळ लागून पाणी लागतपर्यंत मुरूम उत्खनन करण्यात आले. या प्रकाराची दखल पुन्हा महसूल प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे. तुमसर व मोहाडी तालुक्यात सध्या मुरूम भरावाची कामे बंद असल्याची माहिती आहे. कंपनीचे अधिकारी लीज मंजुरीकरिता महसूल कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याची माहिती आहे.कोट्यवधींची कामे सध्या तुमसर-मोहाडी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहेत. हजारो ब्रास मुरूम येथे भरावाकरिता लागत आहे. उपलब्ध मुरूम कमी असून लीज देण्याकरिता ब्रासची मर्यादा आहे. त्यामुळे जमिनीचा तळ लागेपर्यंत अंदाजे मुरूम उत्खनन सुरू आहे. पर्यारणाला येथे धोका निर्माण झाला आहे.विकस कामांमुळे पर्यावरण नियमांचे येथे सर्रास उल्लंघन होतानी दिसत आहे. महसूल विभागाच्या प्रामाणिक प्रयत्नामुळे येथे कंत्राटदाराचे पितळ उघडे पडले आहे. संबंधित प्रकरणाची जिल्हाधिकारी तथा पर्यावरण मंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली आहे. सदर प्रकरणी काय कारवाई होते, याकडे तुमसर व मोहाडी तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.