शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

खापरी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2016 00:23 IST

गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असलेल्या खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसन कुठे व कसे करावे, यासंदर्भात ग्रामस्थ, भूअर्जन अधिकारी व गोसेखुर्द पुनर्वसन....

प्रकल्पग्रस्तांशी चर्चा : नाना पटोले यांचे आश्वासनपवनी : गोसेखुर्द धरणामुळे बाधीत असलेल्या खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसन कुठे व कसे करावे, यासंदर्भात ग्रामस्थ, भूअर्जन अधिकारी व गोसेखुर्द पुनर्वसन विभाग यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. त्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. पुनर्वसनास विलंब लागत असल्याने स्वेच्छा पुनर्वसन करावी, अशी मागणी झाली. त्यानुसार विशेष ग्रामसभा आयोजित करून ठराव संमत करण्यात आला तरीसुद्धा कुटुंबाची माहिती उपलब्ध नाही, असे कारण पुढे करून संबंधित अधिकारी पुनर्वसनाचे प्रकरण प्रलंबित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.परसोडी खापरी येथील रूपचंद माटे या इसमाचा वाघाने बळी घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीयांचे सांत्वन करून शासकीय मदत देऊन परत येत असताना खापरी रेहपाडे येथील ग्रामस्थांनी खासदार नाना पटोले यांना थांबवून पुनर्वसनाची व्यथा सांगितली. गोसेखुर्द धरणात साठविलेले पाणी व उमरेड कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य या दोहोमुळे नागरिक त्रस्त असल्याने शक्य तितक्या लवकर गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली असता खासदार नाना पटोले यांनी गोसीखुर्दचे पुनर्वसन विभाग तसेच उमरेड-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्य या दोन्ही विभाग प्रमुखांसोबत चर्चा करून खापरी रेहपाडे गावाचे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार, असे आश्वासन नागरिकांसोबत झालेल्या चर्चेत दिले. पुनर्वसनाचा जास्तीत जास्त लाभ बाधीत कुटुंबांना मिळावा, अशी शासनाची भूमिका असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.यावेळी जि.प.माजी सभापती हंसा खोब्रागडे, उमरेड-कऱ्हांडला वनजीव विभागाचे डीएओ भलावी, गोसीखुर्द धरण विभागाचे कार्यकारी अभियंता काळे, पुनर्वसन संघर्ष समितीचे अध्यक्ष बिसन शेंडे, सचिव जितेंद्र रेहपाडे, मनोहर सुर्यवंशी, डॉ. सुनिल जीवनतारे, उपसरपंच सुखराम वटी, नरेश रेहपाडे, प्रकाश रेहपाडे, अशोक भोयर, पांडू भोयर, अ‍ॅड. जनार्धन जीवनतारे व ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)