शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न संसदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 21:46 IST

जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

ठळक मुद्दे२२ गावांचा समावेश : मधुकर कुकडे यांनी केली कलम १९३ अंतर्गत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या संदर्भात खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करून कलम १९३ अंतर्गत चर्चा घडवून आणली. विशेष म्हणजे २२ गावातील नागरिकांनी लोकसभा पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.पवनी तालुक्यातील गोसेखुर्द अर्थात इंदिरा सागर प्रकल्प आहे. १९८६ मध्ये या प्रकल्पाची सुरुवात झाली. परंतु आजही या प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या कायम आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर या परिसरातील २२ गावातील नागरिकांनी बहिष्कार टाकला होता. एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नव्हता. आता त्यांचा हा प्रश्न खासदार मधुकर कुकडे यांनी लोकसभेत उपस्थित केला. नियम १९९३ अंतर्गत झालेल्या चर्चेत त्यांनी या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या.गोसेखुर्द प्रकल्पातील बाधितांना कोणत्याही सुविधा मिळाल्या नाहीत. सिंचन पॅकेजचाही लाभ मिळाला नाही. घराचे पट्टेही अनेकांना मिळाले नाही. त्यामुळेच या परिसरातील २२ गावातील लोकांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे सांगत असा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचे लोकसभेत सांगितले. अनेक शेतकरी या प्रकल्पामुळे भूमिहीन झाले आहेत. त्यांच्या मुलासमोर रोजगाराचा प्रश्न आहे. अनेक प्रकल्पग्रस्त आज उपेक्षिताचे जिने जगत आहे. आपल्या भविष्याची शिदोरी या प्रकल्पाने हिरावून घेतली. शासनाने सरुवातीला त्यांना मोठी आश्वासने दिली होती. परंतु या आश्वासनाची पुर्तता पुर्नवसनात झाली नाही. अनेक समस्या आजही कायम आहेत. आजपर्यंत हा प्रश्न संसदेत कुणीही उपस्थित केला नव्हता. परंतु पोटनिवडणुकीनंतर खासदार झालेले मधुकर कुकडे यांनी या प्रश्नाला वाचा फोउली. या सर्वांच्या समस्या सोडविल्या तर भविष्यात ते निवडणुकीवर बहिष्कार टाकणार नाहीत. असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.बावनथडीचे पाणी शेतकऱ्यांना द्यातुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील १२ गावातील शेतकºयांनी पोटनिवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या मुद्यावरही खासदार मधुकर कुकडे यांनी संसदेचे लक्ष वेधले. बावनथडी परिसर आदिवासी बहुल आहे. पाण्याअभावी शेती पिकेनाशी झाली आहे. या सर्व प्रकरणी सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे. बावनथडी प्रकल्पाचे पाणी कालव्याच्या माध्यमातून सोडण्याची गरज आहे. यातून विजेची बचत होईल आणि गावातील शेतकºयांनाही पाणी मिळेल असे खासदार कुकडे यांनी संसदेत सांगितले.