शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीमुळे प्रस्थापितांना धक्का

By admin | Updated: January 19, 2015 23:59 IST

जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजपमय वातावरण आहे. भाजपने पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर लोकसभा आणि अलिकडेच विधानसभा काबीज करुन गड जिंकला आहे.

भंडारा : जिल्ह्यात सद्यस्थितीत भाजपमय वातावरण आहे. भाजपने पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर लोकसभा आणि अलिकडेच विधानसभा काबीज करुन गड जिंकला आहे. सोमवारला झालेल्या आरक्षण सोडतीनंतर बदललेल्या क्षेत्रातून नवीन उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कसरत करावी लागणार आहे. ही निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठी प्रतिष्ठेची तर विरोधकांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. या निवडणुकीवरच दोन वर्षांनंतर येणाऱ्या भंडारा - गोंदिया विधान परिषदेचे समिकरण अवलंबून राहणार आहे.सोमवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात जिल्हा परिषद निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मिलिंद बन्सोड उपस्थित होते. या आरक्षण सोडतीमुळे जिल्हा परिषद क्षेत्रातील राजकीय समिकरण पुर्णत: बदलणार आहे. आतापर्यंत जे ५२ सदस्य होते त्यापैकी ४९ क्षेत्रातील उमेदवारांना आरक्षणाचा फटका बसला आहे.महिलांचा वाटा ५० टक्के५२ सदस्यीय जिल्हा परिषदेत मागीलवेळी ३३ टक्के महिला आरक्षणामुळे महिला सदस्य संख्या १८ होती. यावेळी ५० टक्के महिला आरक्षणामुळे महिला सदस्य संख्या २६ राहणार आहे. यात अनुसूचित जाती प्रवर्गामधून पाच, अनुसूचित जमाती प्रवर्गामधून दोन, ओबीसी प्रवर्गामधून सात आणि खुला प्रवर्गामधून १२ असे एकूण २६ महिला उमेदवार राहतील.सात पंचायत समितीमधील १०४ क्षेत्रांपैकी ५२ जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे सत्तेत महिलांचा वाटा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)