शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

गोदामाअभावी धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:43 IST

शासकीय धान खरेदी केंद्र गोडावून क्षमता संपल्यामुळे मागील आठ दिवसांपासून धान मोजणी बंद आहे. त्यामुळे चौरास भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : चौरास भागातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव चौ. : शासकीय धान खरेदी केंद्र गोडावून क्षमता संपल्यामुळे मागील आठ दिवसांपासून धान मोजणी बंद आहे. त्यामुळे चौरास भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे केंद्राबाहेर धानाच्यव पोती उघड्यावर ठेवल्या आहेत.मागील दोन महिन्यांपासून आसगाव येथे बाजार समितीच्या यार्डात शासकिय धान केंद्र सुरु होते. या गोदामात शासनामार्फत ५०९४ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. त्या धानाच्या चुकाऱ्या पोटी शेतकऱ्यांना १२ डिसेंबर पर्यंत मोजलेल्या धानाचे चुकारे सुध्दा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. परंतु आता आठ दिवसापासून गोडावून मध्ये मोजलेला माल साठवून ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे धानाची मोजणी बंद आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना धान मोजणीसाठी आता निलज जवळील आमगाव येथे धान मोजण्यासाठी जावे लागत आहे. आमगाव येथे धान मोजण्यासाठी जाने म्हणजे शेतकऱ्यांवर जाण्यायेण्याचा व गाडी भाड्याचा हजारो रुपयांचा खर्च शेतकऱ्यांवर बसत आहे. त्यामुळे आसगाव येथील गोडामातील माल शासनाने उचलावा व येथील शेतकºयांना धान मोजण्यासाठी जागा मोकळी करुन दयावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.आसगाव, चकारा, पौनी तील गोदाम भरले आहे. माल उघड्यावर दोन हजार क्विंटल पडला आहे. दोन महिन्यापासून ठेवलेले धानाबाबत सुचना करुन व लेखी डि.ओ. दिले नाही. यामुळे खरेदी-विक्री संस्था डबघाईस आलेली आहे. त्यामुळे शासनाने या धान्याची गोदामातून लवकर उचल करण गरजेचे आहे.-माणिकराव ब्राम्हणकर,अध्यक्ष ख.वि. संस्था, पवनी