शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात ७५ लाख क्विंटल धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 13:10 IST

बाजारपेठेपेक्षा मिळणारे अधिक दर आणि उच्च प्रतीचा धानही आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी येत असल्याने यंदा पूर्व विदर्भात धानाची विक्रमी खरेदी झाली आहे.

ठळक मुद्दे भंडारा-गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक खरेदीविक्रमी उत्पन्न

ज्ञानेश्वर मुंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बाजारपेठेपेक्षा मिळणारे अधिक दर आणि उच्च प्रतीचा धानही आधारभूत केंद्रावर विक्रीसाठी येत असल्याने यंदा पूर्व विदर्भात धानाची विक्रमी खरेदी झाली आहे. पणन महामंडळ आणि आदिवासी विकास महामंडळाने फेब्रुवारी महिनाअखेर ७५ लाख क्विंटल धान खरेदी केले आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विक्रमी ४५ लाख क्विंटल धान खरेदी झाली आहे.पूर्व विदर्भात भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर जिल्हे धान उत्पादक म्हणून ओळखले जाते. सर्वसाधाण आणि उच्च प्रतिच्या धानाची लागवड शेतकरी करतात. अलिकडे उच्च प्रतिच्या धानाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल सर्वसाधारण धान लागवडीकडे आहे. ८० टक्के क्षेत्रात या धानाची लागवड होत आहे. सर्वसाधारण धानाचे आधाभूत दर १८१५ रुपये तर उच्च प्रतीच्या धानाला १८३५ रुपये प्रती क्विंटल दर आहेत. बोनस आणि दर वाढीने धानाला प्रती क्विंटल २५०० रुपये दर आधारभूत केंद्रावर मिळत आहे. उलट बाजारपेठेत धान केवळ १५०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी केला जात आहे. त्यामुळे सर्वच शेतकरी आपला धान आधारभूत खरेदी केंद्रावर विकत आहे. उच्च प्रतीचा धानही दरात फारसा फरक नसल्याने शेतकरी आधारभूत केंद्रावर विकत आहेत. त्यामुळे यंदा धानाची प्रचंड आवक वाढली असून गोदाम हाऊसफुल्ल झाले आहेत.पणन महासंघ आणि आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आधारभूत धान खरेदी केला जातो. १ नोव्हेंबर २०१९ पासून धान खरेदीला प्रारंभ झाला असून पूर्व विदर्भात आतापर्यंत तब्बल ७५ लाख क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. आणखी महिनाभर ही खरेदी सुरू राहणार असल्याने हा आकडा १०० लाख क्विंटलपर्यंत जाण्याची शक्यता आहे.पणन महामंडळाने ५१ लाख नऊ हजार ९९४ क्विंटल धानाची खरेदी केली आहे. त्यात सर्वाधिक गोंदिया जिल्ह्यात २४ लाख ८१ हजार ४३५ क्विंटल आणि भंडारा जिल्ह्यात १९ लाख सहा हजार ५५६ क्विंटल धान खरेदी झाली आहे. तर आदिवासी विकास मंडळाने २२ लाख १४ हजार ७०० क्विंटल धान खरेदी केली आहे. त्यात नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यात १० लाख ४४ क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यात एक लाख २७ हजार क्विंटल, गडचिरोली जिल्ह्यात सात लाख ८२ हजार क्विंटल आणि अहेरी येथे तीन लाख ९६ हजार क्विंटल धानाची खरेदी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती