शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

-तर दंडात्मक कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 23:59 IST

जंगलव्याप्त घाटी तलावातून मुरूम खनन करताना काठावरील वृक्षांना नुकसान पोहोचविल्याचा ठराव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तुमसर तहसिलदारांना सादर केला.

ठळक मुद्देवनविभागाचा अहवाल : तलावातील मुरूम खननाचे प्रकरण

मोहन भोयर।आॅनलाईन लोकमततुमसर : जंगलव्याप्त घाटी तलावातून मुरूम खनन करताना काठावरील वृक्षांना नुकसान पोहोचविल्याचा ठराव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी तुमसर तहसिलदारांना सादर केला. वनअधिनियम तथा महसूल अधिनियम अंतर्गत चौकशीअंती दोषीवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. सोदेपुर-खैरटोला रस्त्याशेजारी घाटी तलावातून मुरूम खनन केले होते.जिल्हा परिषदेच्या मालकीचा घाटी तलाव सातपुडा पर्वत रांगात आहे. विकासात्मक कामाकरिता या तलावातून महसूल प्रशासनाने ५०० ब्रास मुरूम खनन करण्याची परवागनी दिली आहे. येथे तलाव काठावरून मुरूम उत्खनन करण्यात आले आहे. तलाव काठावर लहान मोठी वृक्ष आहेत. त्यापैकी काही वृक्षांना येथे धोका पोहोचविण्यात आला आहे. हा परिसर महसूल विभागाचा आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मंगळवारी तलाव काठाची व वृक्षांची पाहणी केल्यानंतर तहसिलदारांकडे अहवाल सादर केला. यात तलाव काठावरील वृक्षांना नुकसान पोहोचविल्याची माहिती नमूद असल्याचे जोशी यांनी सांगितले.घाटी तलाव २४ हेक्टरमध्ये आहे. गटक्रमांक ३४१ मध्ये हा तलाव असून मुरूम खननाची परवानगी दिली आहे, नियमबाह्यपणे मुरूम खनन केले, व तलाव काठावरील वृक्षांना धोका झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे, असे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी सांगितले.वनविभागाने दिलेल्या अहवालाची तपासणी व चौकशी केली जाईल. महसूल अधिनियमांचा भंग कला असेल तर त्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, तलाव काठावर खड्डे पाडले असतील तर ते बुजविण्याचे आदेश देणार आहे.-गजेंद्र बालपांडे, तहसिलदार तुमसर.